तिसगाव- कासारपिंपळगाव रस्त्यावरील धोकादायक स्पीड ब्रेकर हटवा : संदिप राजळे

तिसगाव- कासारपिंपळगाव रस्त्यावरील धोकादायक स्पीड ब्रेकर हटवा : संदिप राजळे

 

(सुनिल नजन “चिफब्युरो”स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) संभाजीनगर – अहिल्यानगर जिल्ह्याला जोडणारा पैठण-शेवगाव-तिसगाव या रस्त्याचे रुंदीकरण आणि सिमेंट काॅंक्रीटीकरणाचे काम हे अतिशय कासवाच्या चालीने आणि संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांना या रस्त्याने प्रवास करताना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करताना अतिशय त्रेधातिरपीट उडत आहे.या रस्त्यावर अस्तव्यस्त पडलेल्या खडीमुळे अनेक छोटे मोठे अपघात दररोजच थोड्या फार प्रमाणात घडतात.काही प्रवाशांना तर आपला जीवही गमवावा लागला आहे.त्यामुळे कोपरे,हनुमान टाकळी, कवळेवस्ती,कासार पिंपळगाव या परीसरातील प्रवासी पर्याय म्हणून या तिसगाव -ढवळेवाडी फाटा या रस्त्याचा वापर करतात.तिसगाव ते कासार पिंपळगाव मार्गे ढवळेवाडी फाटा या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम जवळ जवळ पूर्ण झाले आहे. फक्त ढवळेवाडी फाट्यावर शंभर फूट अंतरावर आणि कासार पिंपळगावातील मागासवर्गीय स्मशानभूमी जवळ शंभर मीटर अंतरावर खडीकरण आणि डांबरीकरणाचे काम अपूर्ण राहीलेले आहे. तसेच या रस्त्यावर अतिशय कमी प्रमाणात डांबराचा वापर करण्यात आला आहे.पर्याय म्हणून या रस्त्याचा वापर या परीसरातील प्रवासी करतात.तिसगाव शिवारातील खंडागळे -लवांडे वस्तीजवळ नदी प्रवाहाचा श्रोत असल्यामुळे सारखी दलदल निर्माण होते म्हणून या परीसरात काही मीटर लांबीचा सिमेंट काॅंक्रीटीकरणाचा रस्ता बनवण्याचे काम भर पावसाळ्यात सुरू आहे.परंतु रस्त्यावरील या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून अत्यंत अवाजवी उंचीचे आणि अनियंत्रित प्रकारचे सिमेंटच्या सहाय्याने स्पीड ब्रेकर बनवन्यात आले आहे.हे स्पीड ब्रेकर रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करीत आहे. रस्त्यावरील वाहनांचे बुड( हाउजींग)या स्पीड ब्रेकरला टेकून वाहनांचे आतोनात नुकसान होत आहे. तसेच दुचाकीवरून जाणारे प्रवासी हे गाडीवरून तोल जाऊन खाली पडून किरकोळ अपघात होत आहेत. या अनियोजित स्पीड ब्रेकर मुळे सर्व वाहनास आणि प्रवाशांच्या जिवीतास धोका निर्माण झाला आहे. या स्पीड ब्रेकरमुळे वाहन सुरक्षा कायद्याचे तिनतेरा वाजले आहेत. म्हणून या भागातील कासार पिंपळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते क्रुषिमीत्र संदिप राजळे यांनी अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुंगसे साहेब यांचे दार ठोठावत या रस्त्यावरील सदर धोकादायक स्पीड ब्रेकर हटवण्याची लेखी मागणी केली आहे.प्रवाशांचे म्हणणे आहे की येथे स्पीड ब्रेकर असावे परंतु त्याची अवाजवी उंची ही कमी प्रमाणात असावी.हे स्पीड ब्रेकर बनवताना हा ठेकेदार काय नशेत होता की काय असे सर्व सामान्य लोक बोलू लागले आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसार योग्य उंची आणि रचनेचे स्पीड ब्रेकर बनवन्यात यावे. तसेच भविष्यातील कोणत्याही रस्त्यावरील स्पीड ब्रेकर हे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (pwd)परवानगी शिवाय बनवण्यात येऊ नयेत.उठसुट कोणीही येतो आणि आमच्या दारात स्पीड ब्रेकर बसवा अशी मागणी करतो ही एक फॅशनच झाली आहे.तसेच या रस्त्यावरील धोकादायक स्पीड ब्रेकर मुळे भविष्यात जर अपघातात काही जिवीत आणि वित्तीय हानी झाली तर त्याची सर्व जबाबदारी ही कार्यकारी अभियंता आणि सार्वजनिक बांधकाम विभागावर राहील असे संदिप राजळे यांनी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियमानुसारच हा स्पीड ब्रेकर व्हावा अशी प्रवाशांची मागणी आता जोर धरू लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मुंगसे साहेब नेमकी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.