वारंवार लग्नाची मागणी करणाऱ्या मामाच्या विवाहित मुलीला तिच्या दोन मुलांसह कायमचे संपविले,हातावरील “जयभीम”नावावरून पोलीसांनी लावला तपास,आरोपीस ११जून पर्यंत पोलिस कोठडी

वारंवार लग्नाची मागणी करणाऱ्या मामाच्या विवाहित मुलीला तिच्या दोन मुलांसह कायमचे संपविले,हातावरील “जयभीम”नावावरून पोलीसांनी लावला तपास,आरोपीस ११जून पर्यंत पोलिस कोठडी

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) वारंवार लग्नाची मागणी करणाऱ्या मामाच्या विवाहित मुलीला तिच्या दोन मुलांसह कायमचे संपविले हातावरील जयभीम नावावरून पोलीसांनी लावला तपास आरोपीस ११जून पर्यंत पोलिस कोठडी. या बाबत मिळालेली माहिती अशी की दिनांक २३ मे २०२५ रोजी खंडाळे तालुका शिरूर जिल्हा पुणे येथे संशयित आरोपी गोरख पोपट बोखारे वय (३६वर्षे) राहणार चिखली,तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर, हल्ली मुक्काम सरदवाडी ,तालुका शिरूर, जिल्हा पुणे याने आपल्या मामाची विवाहित मुलगी स्वाती केशव सोनवणे (वय२५वर्षे) राहणार वाघेला,तालुका माजलगाव,जिल्हा बीड, आणि तीची दोन मुले स्वराज वय (३वर्षे) आणि विराज वय(१वर्ष),यांना आळंदी येथुन सरदवाडी कडे मोटार सायकल वरून घेऊन गेला.रांजणगाव गणपती परीसरातील ग्रोवेल कंपनी जवळच्या निर्जन ठिकाणी थांबून तिघांचाही गळा आवळून व नंतर डोक्यात दगड घालून ठार केले आणि खुन केला. गुन्हा लपविण्यासाठी म्रृतदेहावर पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला. मयत स्वाती सोनवणे ही आरोपीच्या भावाची पत्नी होती.म्हणजे गोरख बोखारे हा स्वातीचा दीर होता. पोलिसांच्या तपासानुसार पिडीतेने आरोपीशी दुसरे लग्न करण्यासाठीचा हट्टच धरला होता आणि आरोपीची पिडीतेशी दुसरे लग्न करण्या साठीची ईच्छाच नव्हती तो फक्त कामापुरताच तीचा वापर करून घेत होता. दुसऱ्या लग्नाच्या कटकटीतून मोकळे होण्यासाठी त्यांने हे क्रुरपणे तिहेरी हत्याकांड केले होते. दरम्यान या गुन्ह्याबाबत रांजणगाव एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर १६४/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम १०३(१),२३८ या कलमान्वये दिनांक २५/५/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.या हत्याकांडाचा तपास करण्यासाठी पुणे पोलिसांच्या पुढे फार मोठे आव्हान निर्माण केले होते.पुणे (ग्रामिण)जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसींह गील यांच्या मार्गदर्शनाखाली या तिहेरी हत्याकांडाच्या तपासासाठी पोलीसांची सहा स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली होती.या पोलिस पथकांनी पुणे,अहिल्या नगर,बीड या ठिकाणी तपास करत आरोपीचा मागोवा काढीत शोध घेतला होता.या तपासात आरोपीचे मोबाईल लोकेशन, सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज आणि स्थानिक लोकांकडून मिळालेली माहिती घेऊन आरोपी पर्यंत पोहोचण्यास पोलीसांना यश आले होते.एकुण ५० पोलीस अधिकारी,२१० अंमलदार,या तपासासाठी तैनात करण्यात आले होते.१६,५०० भाडेकरू,आणि २५० सीसीटीव्ही कॅमेरे यांची तपासणी करून रांजणगाव गणपती येथील एमआयडीसी पोलीसांनी या गुन्ह्याचा तपास केला होता. संशयित आरोपी बाबद कोणत्याही प्रकारची माहिती नसतानाही पोलीसांनी कसुन चौकशी करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या होत्या.मयत महीलेच्या हातावर “जयभीम”,राजरतन, आणि (RS)ही अक्षरे गोंदवण्यात आली होती. रांजणगाव गणपती येथील पोलीसांनी सदर महीलेचे आणि तीच्या मुलांच्या अर्धवट जळालेल्या म्रुतदेहाचे छायाचित्रे संपूर्ण महाराष्ट्रातील पोलिस ठाण्यात तपासासाठी प्रदर्शित केली होती.पुणे ते अहिल्यानगर,राहुरी, या ठिकाणच्या मार्गावरील परीसरातील २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासले होते.जिल्हा पोलिस अधीक्षक संदीपसींह गील यांनी ३३ पोलिस अंमलदारांची एक स्वतंत्र बैठक घेऊन या गुन्ह्याच्या तपासासाठी मार्गदर्शन केले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी या सहा पथकाद्वारे २८अंमलदार हे प्रत्येक जिल्ह्यात पाठविले होते.स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि रांजणगाव एमआयडीसी पोलिस यांच्यात या गुन्ह्याच्या तपासासाठी सतत समन्वय साधून योग्य तपास करीत असताना बीड जिल्ह्यातील माजलगाव पोलिस स्टेशनमध्ये दिनांक ९ मे २०२५ रोजी एक महीला बेपत्ता असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली होती. पोलिसांना बेपत्ता महीला आणि मयत महीला यांचे वर्णन मिळते जुळते असल्याचे दिसून आले.मग पोलीसांनी सखोल तपास केला असता मयत महीला आणि बेपत्ता महीला स्वाती केशव सोनवणे (वय२५) राहणार वाघेला, तालुका माजलगाव, जिल्हा बीड ही एकच असल्याची खात्री झाली होती.तपास करताना तीचा पती केशव सोनवणे यांच्या कडे चौकशी केली असता त्यानें तीची दोन मुले स्वराज (वय३वर्षे) आणि विराज (१वर्ष) यांच्या सह ती तीच्या आई वडीलांकडे आळंदी येथे गेली असल्याची माहिती मिळाली होती.स्वाती हीचे आणि तीच्या नवऱ्याचे सतत भांडणे होत असल्याने स्वातीच्या बहीणीचा दीर गोरख पोपट बोखारे वय (३६वर्षे)राहणार चिखली,तालुका श्रीगोंदा,जिल्हा अहिल्यानगर हल्ली मुक्काम सरदवाडी तालुका, शिरूर, जिल्हा पुणे याच्या मोटार सायकल वर बसून २३ मे रोजी रात्री आळंदी येथे गेल्याची माहिती मिळाली.मयत स्वाती हीचे आई वडील आळंदी येथे मोल मजुरी करीत असल्याने त्यांनी तीच्या बद्दल माहिती घेतली नाही.ती कोठे आहे हे देखील त्यांना माहीत नव्हते.मग पोलीसांनी गोरख बोखारे याला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता गोरख बोखारे याच्या भावाला स्वाती सोनवणे हीची बहीण दिली असून स्वाती सोनवणे ही आरोपीच्या चुलत मामाची मुलगी होती.नातेवाईक म्हणून स्वाती व तीच्या नवऱ्याचे वाद आरोपी गोरख बोखारे हा मिटवत असे. त्याच दरम्यान स्वाती सोनवणे आणि आरोपी गोरख बोखारे यांचे प्रेमसंबंध जुळले होते.स्वाती सोनवणे ही सारखे सारखे गोरख बोखारे याच्या कडे नेहमीच लग्नाची मागणी करीत होती.याचा सारखा वैताग आल्यामुळे २३ मे २०२५ रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे यांनी त्याच्या जवळील मोटार सायकल वर आळंदी येथुन बसून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला मोटार सायकल थांबवून स्वातीने सारखा सारखा केलेल्या लग्नाच्या मागणीला कडाडून विरोध केला होता.लग्नाच्या मुद्द्यावरील भांडणं गुद्द्यावर आले. शिवीगाळ वादावादी झाली.त्यामुळे त्यांच्यात इतक्या रात्री जोरदार हाणामारी झाली.स्वातीने मग बलात्काराच्या गुन्ह्याखाली पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करीन अशी धमकी दिली याचा राग अनावर होऊन गोरख बोखारे यांनी स्वाती व तीच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला.व मयताचे चेहरे ऒळखू येवूनये म्हणून नंतर मोटार सायकल मधील पेट्रोल टाकून म्रुतदेह जाळण्याचा प्रयत्न केला.या बाबद संशयित आरोपीने पोलीसांकडे कबुली जबाब दिला आहे.मग पोलीसांनी आरोपीला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सदर आरोपीस ११ जून पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे.फक्त मौजमजा करून वासनेच्या डोहात बुडालेला सैतान नेमकं काय क्रुत्य करू शकतो हे या घटनेवरून दिसून येते.