वैशाली सुर्यवंशी यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ताईंच्या पाठीशी

वैशाली सुर्यवंशी यांचे मताधिक्य वाढविण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट ताईंच्या पाठीशी..

 

 

पाचोरा, प्रतिनिधी

संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागुन असलेल्या पाचोरा मतदार संघाची विधानसभेची रणधुमाळी सुरू झाली असुन एकलव्य आदिवासी संघटनेच्या पाठोपाठ पाचोरा येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आर. पी. आय.) आठवले गट यांनी आपला जाहीर पाठिंबा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या अधिकृत उमेदवार वैशाली सुर्यवंशी यांना दिल्याने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या आदेशानुसार सदरचा पाठिंबा देण्यात आला असुन वैशाली सुर्यवंशी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. आ. रोहित पवार यांची भडगाव येथे ५ नोव्हेंबर रोजी वैशाली सुर्यवंशी यांच्या प्रचारार्थ मोठ्या जन समुदायाच्या उपस्थितीत सभा झाली. आ. रोहित पवार यांच्या उपस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष आनंद खरात, तालुका अध्यक्ष विनोद अहिरे, विभागीय अध्यक्ष भालचंद्र ब्राम्हणे, जिल्हा सरचिटणीस प्रविण बागुल, तालुका उपाध्यक्ष रामदास गायकवाड, शहर अध्यक्ष प्रविण बागुल, तालुका सचिव सतिष सोनवणे यांच्या सह्यानिशी असंख्य कार्यकर्त्यांसह पाठिंब्याचे पत्र वैशाली सुर्यवंशी यांना देण्यात आले आहे.