पाचोरा येथील कृष्णा रेसिडेन्सी येथे महादेव मंदिराचे भुमिपुजन शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते

पाचोरा येथील कृष्णा रेसिडेन्सी येथे महादेव मंदिराचे भुमिपुजन शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते

पाचोरा ( प्रतिनिधी )
पाचोरा येथील जुना अंतुर्ली रोड परिसरातील कृष्णा रेसिडेन्सी येथे आज महादेव मंदिराचे भुमिपुजन शिवसेना नेत्या सौ.वैशालीताई सुर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले सर्व प्रथम हनुमान मंदिरात नारळ वाढवून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली सौ. वैशालीताईंचे स्वागत कृष्णा रेसीडेन्सी येथील उपस्थित सर्व महिलांनी केले या प्रसंगी सौ. वैशालीताई यांनी आपल्या मनोगतात सर्व महिलांना व्यावसायिक मार्गदर्शन करुन आपल्या मुलांना अध्यात्मिकतेचे ज्ञान देवून योग्य संस्कार घडवावे सर्वांनी कॉलनीत एकोबा ठेवून सण उत्सव आनंदाने साजरे करावे असे आवाहन सौ. ताईंनी केले या प्रसंगी अनिता चौधरी, इंदुबाई पाटील, सोनी धोबी, शांताबाई पाटील, आरती शर्मा भगवान पवार, किरण मोरे, राजु चौधरी, संदिप चव्हाण, सोनवणे डॉक्टर व असंख्य बंधु भगिनी उपस्थित होते.