सरस्वती ग्रुपचे एमजी कंपनीचे गाड्यांचे शोरूम ग्राहकांच्या सेवेत सेवारत

सरस्वती ग्रुपचे एमजी कंपनीचे गाड्यांचे शोरूम ग्राहकांच्या सेवेत सेवारत
जळगाव, बुलढाणा, अकोला,या जिल्याची ऑथराइज डीलरशिप सरस्वती समूहाला…

सरस्वती गृप आता ! एमजी मोटर्स इंडियाचे जळगांव, अकोला बुलढाणा, जिल्ह्याचे अधिकृत डीलर असून एमजी गाड्यांचे शोरूम ग्राहकांच्या सेवेत नुकतेच कार्यरत झाले आहे.सरस्वती एमजी ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी कार डीलरशिप आहे. शोरूमच्या माध्यमातून एमजी गाड्यांचे बुकिंग ,विक्री, ग्राहकांसाठी टेस्ट ड्राइव्ह, सर्विस, बॉडीशॉप,स्पेअर पार्ट आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.एमजी गाड्या या संपूर्णतः भारतीय बनावटीच्या असून ”फर्स्ट इन सेगमेंट” ‘ मध्ये विविध प्रकारचे, मोठ्या प्रमाणात फिचर्स MG कार्समध्ये उपलब्ध आहेत. JSW ग्रुप इंडिया यांनी MG मोटर इंडिया यामध्ये ३8% स्टेक नुकतेच विकत घेतले आहेत.

उत्तर महाराष्ट्रातील अतिशय जुना उद्योगसमूह म्हणजे सरस्वती डेअरी होय. गुणवत्ता व पारदर्शितेच्या आधारावर उद्योगविश्वात आपले विश्वासार्ह स्थान निर्माण केलेला उद्योगसमूह म्हणून जळगावातील ‘सरस्वती ग्रुप ओळखला जातो .

जळगावातील सरस्वती गृप अंतर्गत सरस्वती डेअरी, सरस्वती फोर्ड , सरस्वती इंटरप्राइझेस , व आता! सरस्वती एम.जी.कार्यरत झालेले आहे. सरस्वती ग्रुपच्या MG मोटर्सच्या तत्पर सेवांचा लाभ घ्यावा. असे आवाहन संचालक श्री.मुकेशजी टेकवानी व श्री. धवल टेकवानी यांनी केले आहे.