“जागृत मारोतीची मंत्रमुग्ध करणारी माहिती”

…हनुमान जन्मोत्सव सोहळा…”जागृत मारोतीची…🚩मंत्रमुग्ध करणारी माहिती …”🚩

रोटवद तालुका जामनेर ( माहिती सेवा गजानन देशमुख सर ) प्राचीन काळापासून अध्यात्माचा वारसा घेऊन वसलेलं,स्वयंभू,आशिया खंडात उल्लेखनीय श्री तीर्थक्षेत्र हनुमान देवस्थान रोटवद,ता.जामनेर.

तशी या मंदिराची फार पूर्वीपासून सर्वत्र ख्याती आहेच.नवसाला पावणारा,जागृत,बळ अन् बुध्दीचं प्रतिक, 11महारुद्रांची एकवटलेली शक्ती,श्रध्दा अन् भक्तीचा उगम म्हणून मारोतीरायाची सर्वांना ओळख आहेच.

गावकऱ्यांवर येणारी भली मोठी संकटे मारोतीरायाच्या कृपेने समूळ नष्ट होतात.
अवघ्या 2500-3000 लोकवस्तीच्या या गावात प्रचंड भाव असणारे गावकरी प्रामाणिक कष्ट करून सदैव आनंदी अन् समाधानी तसेच प्रगतीच्या मार्गावर असताना बघायला मिळतात.

गावातील प्रत्येक नवीन कामाचा श्री गणेशा हा मारोतीला साकडं घालूनच केला जातो,अन् तो यशस्वीरीत्या पूर्णही होतो हा इथल्या भाविकांचा तोडका अनुभव आहे.

दर शनिवारी सकाळी संपूर्ण गावं मिळून या मंदिरात हनुमंताची आरती करीत असतात.जो कोणी श्रद्धावान भाविक सलग पाच शनिवार या मंदिरात दर्शनाला येतो,त्याच्या सर्वोतोपरी मनोकामना मारोतीराया पूर्ण करतोच.

मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे मन मोहून टाकणारी देखणी,चालती,बोलती सुंदर अन् बघतच रहावं अशी प्रचंड उंचच-उंच हनुमंताची मूर्ती…

ज्यामुळे दर्शनाला येणाऱ्या प्रत्येक भाविकाची निष्ठा अधिक दृढ होतेच होते.

म्हणून आपणही एकदा अवश्य भेट देऊन या रोटवदच्या मारोतीरायाचा कृपाशीर्वाद मिळवावा.🙏

🚩 *!!जय श्री राम!!* 🚩