Home पाचोरा तालुका वडजी ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात :काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा

वडजी ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात :काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा

वडजी ग्रामसेवकाच्या मनमानी विरोधात :काँग्रेसचे आंदोलनाचा इशारा

भडगाव (प्रतिनिधी) – भडगाव तालुक्यातील वडजी गावातील ग्रामसेवक यांचा मनमानी कारभार वाढत चालला आहे या विरोधात कॉंग्रेस ने आंदोलनाचा इशारा दिला आहे

 

तालुक्यातील वडजी गावातील २५ /१५ हेड खाली रोकडा फार्म येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत सभागृह बांधकाम करण्यात आले आहे या कामासाठी ग्रामसेवक अनिल राठोड यांनी ना हरकत देण्याचा प्रमाणपत्र दिले वास्तविक पाहता हा अधिकार नसताना शाळेला हस्तांतरित करण्यात येत आहे असे मुख्याध्यापक यांच्या नावे आदेश देण्यात आला. हा गैर आदेश असुन ग्रामसेवकानां तोंडी व लेखी अनेक वेळा तक्रार करुन देखिल ग्रामसेवकाने मनमानी कारभार सुरू ठेवला आहे. तसेच ग्रामसेवक हे अप-डाउन करतात ग्रामपंचायत मध्ये उपस्थितीत राहत नसल्याची तक्रार कॉंग्रेस तालुका अध्यक्ष रतीलाल महाजन, शहर अध्यक्ष दिलीप शेंडे, युवक तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, अल्पसंख्यक अध्यक्ष कमर अली, हारुन पटेल, सरचिटणीस भुषण पाटील, अतुल पाटील प्रकाश सोनवणे आदींनी भडगाव पंचायत समिती चे गट विकास अधिकारी श्री वाघ यांना निवेदन देण्यात आले आहे. दि. ३० तारखे पर्यंत सबंधित ग्रामसेवका वर कारवाई न झाल्यास कधीही कॉंग्रेस तर्फे आंदोलन करण्यात येणार आहे

Don`t copy text!