महाराष्ट्र खो-खो संघटनेच्या निवड समितीवर विशाल पाटील यांची निवड…!!!!
जळगाव, दि. २३ मे २०२६ :- महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या सन २०२६-२७ या सालासाठी ५२ वी कुमार-मुली राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी स्पर्धा किरण स्पोर्ट्स,सोलापूर यांच्या विद्यमाने २ ते ५ जून दरम्यान आयोजित करण्यात आली आहे,या स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या निवड समितीवर जळगाव जिल्ह्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा,चांदसर ता.धरणगाव जि.जळगाव येथील क्रीडाशिक्षक श्री.विशाल रमेश पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
उत्तराखंड येथे होणाऱ्या ४५ व्या कुमार मुली राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या प्रातिनिधिक संघातील खेळाडू निवडीसाठी ही निवड चाचणी आयोजित करण्यात येणार आहे.श्री. विशाल पाटील यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या अध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री मा.सुनेत्रा अजित पवार,सचिव डॉ. चंद्रजीत जाधव, जळगाव जिल्हा खो-खो असोसिएशनचे पदाधिकारी आ.चंद्रकांत सोनवणे,प्रा. डी. डी. बच्छाव,शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त गणपतराव पोळ,उदय पाटील,एन. डी. सोनवणे,प्रा.श्रीकृष्ण बेलोरकर, सुनील समदाणे,जयांशू पोळ,सौ.विद्या कलंत्री,राहुल पोळ,अनंता समदाणे,चंद्रकांत महाजन,दत्ता महाजन आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.

















