गो.पु.पाटील,विद्यालय व ज्युनिअर कॉलेज,कोळगाव येथे प्राचार्य अनिल पवार यांचा सेवापुर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न….!!!!!
कोळगाव ता.भडगाव – कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्था संचलित गोपीचंद पुना पाटील,विद्यालय, कोळगाव ता भडगाव येथे आपल्या आयुष्याची ३३ वर्षांची प्रदीर्घ सेवा देऊन प्राचार्य अनिल पवार ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाल्याबद्दल विशेष कार्यक्रमात त्यांना निरोप देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब प्रतापराव पाटील उपस्थित होते तर संस्थेच्या उपाध्यक्षा पुनमताई पाटील,मंत्रालयातील उपसचिव प्रशांतराव पाटील,गटशिक्षणाधिकारी रावसाहेब पाटील,शिक्षण विस्तार अधिकारी गणेश पाटील,हरी रुपचंद पवार, प्रमिला हरी पवार,जिजाबाई प्रभाकर शिसोदे आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस नुतन प्राचार्य आर.आर.वळखंडे यांनी प्रस्ताविक केले,तद्नंतर डी डी पाटील,नरेंद्र भोसले,संदीप बाविस्कर,विवेक पवार,डिंपल पवार तसेच इतर आप्तेष्ट नातेवाईकांनी आबासाहेब अनिल पवार यांच्या कार्य कर्तृत्वावर प्रकाश टाकून आठवणींना उजाळा दिला.
शिक्षण क्षेत्रातील असो किंवा समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीकडून त्यांचा सत्कार करण्यात आला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस ए वाघ,प्रवीण बोरसे,सोनाली सोनवणे यांनी केले तर आभार प्रवीण बोरसे यांनी मानले,कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.



















