गो.से.हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा मानसी भिवसने एम.बी.बी.एस.उत्तीर्ण
पाचोरा – श्री. गो. से. हायस्कूलची माजी विद्यार्थिनी मानसी प्रमिला सुनील भिवसने हिने डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक येथून एम. बी. बी. एस. ची पदवी घेऊन डॉक्टर होण्याचा बहुमान मिळवला असून तिने श्री.गो. से. हायस्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
ती श्री. गो. से. हायस्कूलचे कलाशिक्षक सुनील देवचंद भिवसने यांची कन्या असून तिने प्राथमिक शिक्षण सु. भा. पाटील विद्यालय तसेच माध्यमिक शिक्षण श्री. गो. से. हायस्कूल येथून पूर्ण केले तर व उच्च माध्यमिक शिक्षण एम. एम. कॉलेज येथे घेतले.
त्यांच्या या यशाबद्दल पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, चेअरमन संजय वाघ, मानद सचिव. ॲड. महेश देशमुख, व्हॉइस चेअरमन व्ही. टी. जोशी, शालेय समितीचे चेअरमन खलील देशमुख, तांत्रिक विभागाचे चेअरमन वासुदेव महाजन, मुख्याध्यापक एन. आर. ठाकरे यांचेसह शहरातील सर्व शैक्षणिक,सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
























