नगरसेविका सौ. वर्षा प्रवीण ब्राह्मणे यांना पितृ शोक प्रेमराज महादू सपकाळे यांचं अल्पशा आजाराने दुःखद निधन
पाचोरा शहरातील संभाजीनगर परिसरातील रहिवासी, धम्म बंधू प्रेमराज महादू सपकाळे (सेवानिवृत्त PWI), वय 72 यांचे आज दि. 9 एप्रिल 2026 रोजी दुपारी सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात कुटुंबीयांमध्ये नगरसेविका सौ. वर्षा प्रवीण ब्राह्मणे, विजय सपकाळे व प्रशांत (सोनू) सपकाळे यांचा समावेश असून ते नगरसेवक प्रवीण ब्राह्मणे यांचे सासरे होते.
त्यांची अंत्ययात्रा उद्या दि. 10 एप्रिल 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांच्या राहत्या घरातून, संभाजीनगर येथून निघणार आहे.
तथागत त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो, हीच भावपूर्ण श्रद्धांजली.






















