Home महाराष्ट्र पारध येथे १९ एप्रिल रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा; इच्छुकांनी ३१ मार्चपर्यंत...

पारध येथे १९ एप्रिल रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा; इच्छुकांनी ३१ मार्चपर्यंत नोंदणी करावी

पारध येथे १९ एप्रिल रोजी सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा; इच्छुकांनी ३१ मार्चपर्यंत नोंदणी करावी

 

पारध (महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी) – स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ पारध येथे भव्य सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. १९ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १२.३० वाजता पारध येथील स्व. राजेंद्रजी श्रीवास्तव महाविद्यालय, ता. भोकरदन, जि. जालना येथे संपन्न होणार आहे.

 

स्व. हरिवंशराय बच्चन सेवाभावी संस्था पारध, लाल बहादूर शास्त्री सांस्कृतिक युवा क्रीडा मंडळ पारध व अनुजा बहुउद्देशीय संस्था बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने हा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. या सोहळ्यामुळे गरजू व सर्व समाजातील वधू-वरांना साधेपणाने व सामाजिक वातावरणात शुभविवाहाची संधी मिळणार आहे.

 

सदर सोहळ्यासाठी विवाह नोंदणी अर्ज ३१ मार्च २०२६ पर्यंत स्वीकारले जाणार असून इच्छुक वधू-वरांनी वेळेत नोंदणी करावी, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

 

विवाह नोंदणी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी

अनुजा मनोहर गायकवाड – 8484861034,

भगवान वामनराव जाधव – 9822653234,

विक्रांत श्रीवास्तव (भाईजी) – 9767471309,

सचिन लक्कस सर – 9890105589,

योगेश मोरे सर – 8080445260

यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.

 

या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार असून परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनीही या सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्यांना शुभाशीर्वाद द्यावेत, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Don`t copy text!