चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि. 16 जानेवारी रोजी ‘तृतीय वर्ष कला भूगोल अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे’ आयोजन

चोपडा येथील दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात दि. 16 जानेवारी रोजी ‘तृतीय वर्ष कला भूगोल अभ्यासक्रम पुनर्रचना कार्यशाळेचे’ आयोजन

 

 

 

चोपडा: कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव आणि महात्मा  गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब  डाॅ. सुरेश जी.पाटील महाविद्यालय, चोपडा येथील पदव्युत्तर व संशोधन भूगोलशास्त्र विभाग यांच्यातर्फे तृतीय वर्ष कला भूगोल विषयाच्या एकदिवसीय अभ्यासक्रम (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-2020) पुनर्रचना कार्यशाळेचे आयोजन दि. 16 जानेवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेसाठी  विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयाचे एकूण 100 हून अधिक प्राध्यापक सहभागी होणार आहेत.  या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे अध्यक्ष ॲड. संदीप सुरेश पाटील उपस्थित राहणार असून प्रमुख अतिथी म्हणून महात्मा गांधी शिक्षण मंडळाच्या सचिव ताईसाहेब डॉ. स्मिता संदीप पाटील, या कार्यशाळेचे उदघाटक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव विज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एस. एस. राजपूत, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. डॉ. शिवाजी पाटील, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव भूगोल अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सुरेश शेलार,  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव अधिसभा सदस्य प्रा. डॉ. सौ. मंदा गावित आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

तरी सदर कार्यशाळेत विद्यापीठ परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू-भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे,  उपप्राचार्य प्रा. डाॅ. आर.एम. बागुल, उपप्राचार्य प्रा. डॉ. ए. बी. सूर्यवंशी, कार्यशाळा समन्वयक व महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शैलेशकुमार वाघ तसेच कार्यशाळा सह-समन्वयक डॉ. मुकेश बी. पाटील यांनी केले आहे.