मातीच्या सुगंधातून उभं राहिलेलं स्वप्न आणि त्या स्वप्नातून घडलेली एक चळवळ
वास्तुश्री डिझाईन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा.लि. आणि संचालक प्रतीक पाटील यांची प्रेरणादायी यशोगाथा
अमळनेर(प्रतिनिधी):- “मोठं व्हायचं असेल तर शहरात जा,असं अनेकदा म्हटलं जातं.पण काही जिद्दी माणसं असतात जी सांगतात की, जर मोठं व्हायचं असेल तर आपल्या मातीत जा आणि आपल्या मातीला मोठं करा.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील बाम्हणे येथील मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबात जन्मलेले प्रतीक चंद्रकांत पाटील यांनी आपल्या शिक्षणाची सुरुवात धुळे जिल्ह्यातील बेटावद येथील स्थानिक संस्थेतून केली आणि पुढे *नाशिक येथे बांधकाम क्षेत्रातील शिक्षण घेण्यासाठी वाटचाल केली.* कुटुंबाचा प्रमुख व्यवसाय शेती असला तरी नाविन्यपूर्ण संकल्पना,मेहनत व प्रामाणिकपणा याचं बाळकडू प्रतिक पाटील यांना आई,वडिल व परिवाराकडून आपसुकच मिळाले होते.
शिक्षण घेत असतानाच त्यांनी पृथ्वी कन्स्ट्रक्शन या नामांकित बांधकाम कंपनीत प्रत्यक्ष अनुभव घेतला.पण त्यांचं मन तिथे रमलच नाही, त्याचं स्वप्न काही वेगळंच होत.आपल्या मातीची आणि माणसांची ओढ त्यांना जणू खुणावत होती.आपण मिळविलेल्या ज्ञानाचा उपयोग आपल्या लोकांसाठी करायचा या ध्येयाने ते प्रेरित झाले होते.
२०१३ — एका स्वप्नाचे बीजरोपण
अखेर २०१३ साली त्यांनी आपल्या नोकरीचा त्याग करून अमळनेर सारख्या तालुक्यात “वास्तुश्री” या नावाने छोट्या प्रमाणात इंटेरियर डिझाईन व्यवसायाची सुरुवात झाली.ना मोठं ऑफिस,ना मोठा स्टाफ, होती फक्त मोठी जिद्द आणि स्पष्ट ध्येय.
काही वर्षांतच हे काम संपूर्ण जळगाव जिल्ह्यात व परिसरात पोहोचले. त्यातून त्यांना “शौर्यश्री पार्क” या रो-हाऊस प्रकल्पाची संधी मिळाली.प्रकल्प उत्तम होता.पण,तांत्रिक आणि नैसर्गिक अडचणींचा,अपयशाचा या प्रकल्पात त्यांना सामना करावा लागला,याच प्रकल्पातून आणि संघर्षातून त्यांना काही नवीन शिकवण मिळाली हे मात्र नक्की.अपयश ही यशाची पहिली पायरी असते याच ब्रीदवाक्याने त्यांना नवीन अनुभव मिळाले.फक्त अपयश नव्हतं ते,ते होते अनुभवाचे विद्यापीठ.
वास्तुश्री च्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण तसेच शहरी भागात अनेक उपक्रम राबविले.अनेकदा प्रकल्पासाठी येणाऱ्या ग्रामीण ग्राहकांच्या संवादातून एक कटू वास्तव त्यांना समोर आलं ते म्हणजे,
अनेकदा लोक घर बांधत होते,पण नियोजनाशिवाय.परिपूर्ण प्लॅन नसायचा,स्टील डिझाईन नसायचे तसेच मोजमाप ही नसायचे,अनेकदा चुकीच्या सल्ल्यामुळे बांधलेल्या इमारतीची तोडफोड,मटेरियल वाया जाणे,मानसिक ताण,वेळेचा अपव्यय सोबतच कष्टाचा पैसा चुकीच्या ठिकाणी खर्च होत होता.
ग्रामीण भागातील हाच कळीचा मुद्दा हेरत प्रतिक पाटील यांनी निर्णय घेतला की,आपण आता फक्त इमारती किंवा घर बांधणार नाही तर,सर्वसामान्य माणसाच्या खिश्याला परवडेल असे घराचे परिपूर्ण प्लॅनिंग देऊन शास्त्रशुद्ध,सुरक्षित आणि परवडणारी घरसंस्कृती घडवणार व बनवणार सुंदर घरांचा स्मार्ट महाराष्ट्र.
डिझाइनपासून डेव्हलपमेंटपर्यंत — शाश्वत वाढीचा एक दशकाचा प्रवास”
प्रतिक पाटील यांच्या मेहनतीच्या आणि कष्टाच्या जोरावर वास्तुश्रीचा हा प्रवास प्रोप्रायटरशिपपासून प्रायव्हेट लिमिटेड कंपनीपर्यंत पोहोचला.वास्तुश्री ला १२ वर्ष पूर्ण झालेली असून कंपनीची यशस्वी वाटचाल सुरू आहे.
“वास्तुश्री” ची वैशिष्ट्ये
.वास्तुश्री च्या सोबतीला आज ५०+ उच्चशिक्षित आर्किटेक्ट आणि इंजिनिअर्सची टीम.
* वास्तुशास्त्र नुसार घराचे प्लॅन,स्टील डिझाईन,3D इलेव्हेशन,इंटेरियर व बांधकामासाठी लागणारे परिपूर्ण प्लॅनिंग
* “वास्तुश्री मास्टर फाईल” ही अद्वितीय प्रणाली (USP)
* ऑनलाईन काम असूनही प्रत्यक्ष सुपरव्हिजन यंत्रणा
* महाराष्ट्रातील १८०+ तालुके आणि ४५०+ गावांमध्ये सेवा
सोशल मीडिया व ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ग्रामीण तसेच शहरी महाराष्ट्रात घराच्या नियोजनापासून ते परिपूर्ण, शास्त्रशुद्ध वास्तुनिर्मितीपर्यंत जागरूकता आणि बांधकामाची एक सशक्त चळवळ निर्माण झाली आहे.
✨ राष्ट्रीय पातळीवरील विश्वास
वास्तुश्री हे नाव भारत सरकारच्या चिन्ह नोंदणीद्वारे अधिकृत मालकी हक्कासह संरक्षित झाले आहे.
तसेच ₹१६९ कोटींच्या NHAI प्रकल्पात सुपरव्हिजन कार्याद्वारे कंपनीने आपली तांत्रिक क्षमता सिद्ध केली आहे.ग्रामीण भागात झालेल्या सुरुवातीपासून राष्ट्रीय पायाभूत सुविधांपर्यंतचा हा प्रवास केवळ व्यावसायिक यश नाही तर तो विश्वासाचा विस्तार आहे.
रोजगार, उद्योजकता आणि आर्थिक समृद्धी
वास्तुश्रीचा खरा अभिमान म्हणजे त्यांची प्रत्येक तालुक्यात फ्रॅंचायझी संधी,आठवडी बाजार या ठिकाणी “वास्तुश्री प्रतिनिधी” नेमून रोजगार निर्मिती,ग्रामीण तरुणांना बांधकाम क्षेत्रात करिअरची संधी,सामान्य नागरिकांना कंपनीचे शेअर्स (₹१ लाख प्रति व्यक्ती) प्रमाणे उपलब्ध आहेत.वास्तुश्री ही फक्त एक कंपनी नसून ती ग्रामीण आर्थिक सक्षमीकरणाची चळवळ बनली आहे.
प्रतिक पाटील व त्यांच्या वास्तुश्री चा हा प्रवास स्वप्नवत वाटत असला तरी संघर्षातून मिळालेले ते यश आहे.मात्र त्यांनी एवढ्यावरच न थांबता वास्तुश्री डिझाईन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. चे पुढील उद्दिष्ट आहे SME IPO द्वारे शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग करणे.
कंपनीने फक्त नफा मिळविणे एवढेच उद्दिष्ट न ठेवता “व्यवसायातून नफा आणि नफ्यातून समाजकार्य” हे ब्रीद अवलंबवीले आहे. या समाजकार्याच्या व समाजहिताच्या विचारसरणीमुळे कंपनीने आपले एक वेगळं स्थान निर्माण केले आहे.
वास्तुश्री चे संचालक प्रतीक पाटील यांचा विश्वास आहे की,घर म्हणजे फक्त चार भिंती नव्हे,तर त्या कुटुंबाच्या स्वप्नांची पायाभरणी असते.प्रतिक पाटील यांनी नेहमीच संकटात संधी आणि अपयशात अनुभव साधले आहेत. त्यांनी नेहेमीच आपल्या यशात समाजाला सामावून घेतले आहे.
✨ विस्तार व संधी
वास्तुश्री परिवार ही केवळ एक वास्तूचे प्लॅनिंग व डिझाईन करून देणारी बांधकाम कंपनी नाही तर ती आहे, ग्रामीण व शहरी भागातील शास्त्रीय नियोजनाची चळवळ,तरुणांसाठी उद्योजकतेची संधी, गुंतवणूकदारांसाठी वाढीचा मंच आणि समाजासाठी शाश्वत विकासाचा मार्ग
मातीच्या सुगंधातून उगवलेलं स्वप्न,आज महाराष्ट्राच्या नकाशावर विस्तारलं आहे.आणि हा प्रवास अजून सुरू आहे.वास्तुश्री हे विश्वासाचं नातं, मनापासून जपलेलं.
“आम्ही “वास्तुश्री” ला कंपनी मानतच नाही तो आमचा परिवार आहे.कारण घर म्हणजे केवळ विटा-सिमेंट नव्हे,ते एका कुटुंबाच्या आयुष्यभराच्या स्वप्नांची पायाभरणी असते.आम्ही प्रत्येक ग्राहकाला ग्राहक म्हणून नव्हे, तर कुटुंबातील सदस्य म्हणून स्वीकारतो.विश्वास,पारदर्शकता आणि दीर्घकालीन नातेसंबंध हेच आमचे खरे भांडवल आहे.व्यवसायात भावना आणि व्यावसायिकता यांचा समतोल राखणे हीच आमची ओळख आहे.
घराच्या संकल्पनेपासून ते परिपूर्ण वास्तुनिर्मितीपर्यंत — आर्किटेक्चरल प्लॅनिंग, स्ट्रक्चरल (RCC) डिझाईन, 3D व्हिज्युअलायझेशन, बांधकाम सुपरव्हिजन, कायदेशीर मंजुरी आणि डिजिटल सोल्युशन्स यासाठी आम्ही शास्त्रशुद्ध, तंत्रज्ञानाधारित आणि प्रक्रियाबद्ध सेवा प्रदान करतो.वास्तुश्री मास्टर फाईल प्रणाली, ऑनलाईन-ऑफलाईन एकत्रित सेवा मॉडेल आणि राज्यव्यापी विस्तार यांद्वारे आम्ही ग्रामीण व शहरी महाराष्ट्रात गुणवत्तापूर्ण बांधकामाची नवी संस्कृती निर्माण केली आहे.
आमचा प्रवास केवळ प्रकल्पांपुरता मर्यादित नाही,तो आहे रोजगारनिर्मिती,फ्रॅंचायझीद्वारे उद्योजकता आणि सामान्य गुंतवणूकदारांना भागीदारीची संधी देण्याचा.SME IPO च्या दिशेने वाटचाल करताना आमचा भर आहे शाश्वत वाढ, पारदर्शक व्यवस्थापन आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मितीवर.घर तुमचं असतं मात्र जबाबदारी आमची असते आणि विकास हा सर्वांचा असतो.वास्तुश्री म्हणजे विश्वासाचा हात,जो डिझाईनपासून डेव्हलपमेंटपर्यंत उद्देशपूर्ण,शाश्वत आणि समावेशक वाढीची हमी देतो.
श्री.प्रतीक पाटील
संचालक,वास्तुश्री डिझाईन इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि.

















