Home जळगाव ख्यातनाम लेखक प्रकाश रामदास तेली यांच्या प्रेरणादायी विचार ग्रंथाचे प्रकाशन नाशिकमध्ये झाले

ख्यातनाम लेखक प्रकाश रामदास तेली यांच्या प्रेरणादायी विचार ग्रंथाचे प्रकाशन नाशिकमध्ये झाले

ख्यातनाम लेखक प्रकाश रामदास तेली यांच्या प्रेरणादायी विचार ग्रंथाचे प्रकाशन नाशिकमध्ये झाले

नाशिक :- ख्यातनाम लेखक व जागतिक विक्रमधारक कवी, पत्रकार आणि गीतकार प्रकाश तेली यांच्या प्रेरणादायी विचार (Inspirational thoughts) या ग्रंथाचे प्रकाशन ज्ञानपीठकार व जेष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. सदानंद मोरे (अध्यक्ष-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), दिलीप धोंडगे (माजी अध्यक्ष – भाषा सल्लागार समिती), लक्ष्मीकांत देशमुख (माजी आयएएस आणि अध्यक्ष – भाषा सल्लागार समिती, किरण कुलकर्णी (सचिव – मराठी भाषा विभाग), डॉ. शामकांत देवरे (सचिव – महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ व संचालक राज्य मराठी विकास संस्था मराठी भाषा विभाग), डॉ. मिनाक्षी पाटील (सचिव-महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ), अरुण गीते (संचालक – भाषा संचालनालय) यांच्या हस्ते व अन्य मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत विश्व मराठी संमेलन नाशिक येथे झाले.

        प्रेरणादायी विचार हा ग्रंथ प्रेरणा देणारा असून यात वास्तव लिखाण आहे असे गौरवोद्गार डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी काढले. भविष्यातही असेच समाजाभिमुख साहित्य कार्य अविरतपणे सुरु ठेवावे असे प्रकाश तेली यांना सांगीतले. प्रकाश तेली यांचे आतापर्यंत अठरा 18 सामाजिक ग्रंथ प्रकाशित झालेले असून प्रेरणादायी विचार हा एकोणिसावा ग्रंथ असून लवकरच शाश्वत विचार हा ग्रंथ वाचकांच्या भेटीला येईल असे प्रकाश तेली यांनी सांगीतले.

प्रेरणादायी विचार हा ग्रंथ आपणास काय देतो.

1)    प्रेरणादायी विचार हा ग्रंथ जगण्यास बळ आणि कार्यासाठी  प्रेरणा देतो.

2)    प्रेरणादायी विचार या ग्रंथामुळे नाते व संबंधातील तणाव नष्ट होऊन प्रेम वृद्धिंगत होते.

3)    प्रेरणादायी विचार हा ग्रंथ जीवनास कसा आकार द्यावा याचे ज्ञान देतो.

4)    प्रेरणादायी विचार हा दुर्मिळ आणि आगळावेगळा ग्रंथ आहे त्यामुळे वाचकांच्या इच्छा व आकांक्षा पूर्ण करतो.

5)    प्रेरणादायी विचार ग्रंथांमध्ये वास्तविकता आहे, कोणत्याही प्रकारचे काल्पनिक विचार नाहीत.

6)    प्रेरणादायी विचार हा ग्रंथ जीवन कसे जगावे याची सविस्तर माहिती देतो.

7)    प्रेरणादायी विचार या ग्रंथामध्ये प्रत्येक वाचक मंत्रमुग्ध होतो.

8)    प्रेरणादायी विचार हा ग्रंथ प्रत्येकाच्या अनेक अडीअडचणी सोडवण्यात मोलाची भूमिका बजावतो.

9)    प्रेरणादायी विचार हा ग्रंथ जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो.

10) प्रेरणादायी विचार हा ग्रंथ राष्ट्रीय कार्यास हातभार लावतो.

11) प्रेरणादायी विचार हा ग्रंथ प्रत्येकाच्या जीवनात प्रेमाचा अंकुर फुलवतो.

12) प्रेरणादायी विचार ग्रंथांमुळे सजीवसृष्टी वरील प्रत्येक घटकाचे मोल कळते.

13) प्रेरणादायी विचार हा ग्रंथ जीवनात कसे यशस्वी व्हावे याचे अनेक मार्ग दाखवतो.

14) प्रेरणादायी विचार हा ग्रंथ प्रत्येक घरासाठी आणि घरातील प्रत्येकासाठी आहे.

15) प्रेरणादायी विचार हा ग्रंथ स्वप्न साकार व स्वप्नांना आकार देण्यास सहाय्य करतो.

16) प्रेरणादायी विचार या ग्रंथांमध्ये जीवनाचे अनेक सार सामावलेले आहेत.

प्रकाश तेली यांचे प्रकाशित झालेले 18 ग्रंथ पुढीलप्रमाणे :- प्रकाश तेली यांनी यांचे आता पर्यंत 18 ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत ते पुढील प्रमाणे 1) सड़क सुरक्षा 2) बाल-विवाह 3) बढ़ती जनसंख्या 4) किसान 5) वोट 6) नदी-भारत की जलधारा 7) वोट-2 8) वोट-3 9) खाद्य सुरक्षा 10) वोट-4 11) पानी 12) मन की बात 13) बिजली संरक्षण 14) शिक्षा की महत्ता 15) पेड़ की महत्ता 16) प्रकृति की महत्ता 17) झाडे जीवनाचा आधार – मराठी 18) जीवन म्हणजे काय? – मराठी

प्रकाश तेली यांची प्रतिक्रिया – प्रेरणादायी विचार हा ग्रंथ समाजहित व राष्ट्रबांधणीचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून लिहिलेला आहे. प्रत्येकाची नाळ या ग्रंथाशी जुळलेली असून मला खात्रीच नाही तर पूर्ण विश्वास आहे की, हा ग्रंथ प्रत्येक व्यक्तीचे जीवन बदलण्यात मोलाची भूमिका बजावेल.

               प्रेरणादायी विचार या ग्रंथात २५० वास्तव विचार असून यातील सर्व लिखाण हे वास्तविक आहे. हे एक अभिनव पुस्तक आहे. हे पुस्तक अतिशय सुंदर असून हा ग्रंथ ज्याच्या नजरेस पडतो तो ह्या पुस्तकाच्या प्रेमात पडतो. असे मिशन पब्लिकेशनच्या संचालिका योगिता तेली यांनी सांगीतले. या ग्रंथ निर्मिती कार्यात इंद्रवदन वरणकर, किरण तेली व आर्यन तेली यांनी मदत केली.

Don`t copy text!