राज्यस्तरीय नवचेतना पुरस्काराने किशोर भाऊ रायसाकडा यांचा गौरव
वाशिम (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय नवचेतना पुरस्कार उत्तर महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा यांना प्रदान करण्यात आला. घटनात्मक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हा सन्मान देण्यात आला.
वाशिम येथे आयोजित राज्यस्तरीय अधिवेशनात शनिवारी हा पुरस्कार प्रतापराव जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी रायसाकडा यांना सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमास प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे, प्रदेश कार्याध्यक्ष निलेश सोमानी, भागवताचार्य रमाकांत व्यास, श्री महाकाली संस्थान कासोळा येथील देवीसिंग गजानन माऊली, वाशिम बँकेच्या अध्यक्षा शीला राठी, प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव, रिपाई (आठवले गट) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे, प्रदेश संपर्कप्रमुख वैभव स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार स्वीकारताना किशोर भाऊ रायसाकडा यांनी हा सन्मान वैयक्तिक नसून पत्रकार बांधवांच्या एकत्रित कार्याची पावती असल्याचे नमूद केले. संघटनात्मक कार्य अधिक बळकट करण्यासाठी पुढेही प्रयत्न सुरू ठेवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
खानदेश विभागात पत्रकार संघाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविल्यामुळेच रायसाकडा यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आल्याचे डॉ. विश्वासराव आरोटे यांनी सांगितले.
किशोर भाऊ रायसाकडा यांना पुढील वाटचालीस सर्व स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.























