Home महाराष्ट्र वडुले खुर्द येथील कानिफनाथ यात्रेत आंधळे – तुतारे या मानाच्या कुस्तीने यात्रा...

वडुले खुर्द येथील कानिफनाथ यात्रेत आंधळे – तुतारे या मानाच्या कुस्तीने यात्रा महोत्सवाची सांगता

वडुले खुर्द येथील कानिफनाथ यात्रेत आंधळे – तुतारे या मानाच्या कुस्तीने यात्रा महोत्सवाची सांगता

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या कानिफनाथ यात्रेस सर्व प्रथम अहिल्या नगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील वडुले खुर्द येथे फाल्गुन शुद्ध दशमीच्या दिवशी शुभ मुहूर्तावर प्रारंभ झाला होता.वडुले खुर्द येथील गावातून कानिफनाथ देवाची छबिन्यातून फटाक्यांच्या आतषबाजीत पालखी मिरवणूक काढण्यात आली होती. गावातील असंख्य माता भगिनी आणि सुवासीनींनी कान्होबा देवाला रेवडी,नारळ आणि मलीदा प्रसाद म्हणून अर्पण केला.गावातील हनुमान मंदिरा समोर खेळणीच्या दुकानाची मोठी गर्दी झाली होती.तसेच रात्री संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या मालती इनामदार नारायण गावकर यांच्या लोकनाट्य तमाशाचेही यात्रा कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी सकाळी कलाकारांचा हजेरी कार्यक्रम संपन्न झाला.सायंकाळी चार वाजता कानिफनाथ देवस्थान मंदिरा जवळ महाराष्ट्रातील नामवंत मल्लांच्या कुस्त्यांचा जंगी हंगामा भरवण्यात आला होता.या आखाड्यात विजयी झालेल्या पैलवानांना ईनाम म्हणून रोख स्वरूपात बक्षीसे देण्यात आली. या हगाम्यात शेवटची मानाची कुस्ती ही वडुले खुर्द गावचे भुषण आणि राष्ट्रीय खेळाडू पैलवान गोपी तुतारे विरोधात पैलवान आंधळे अशी झाली.गोपी तुतारे याच्या डोक्यात ग्रामस्था तर्फे मानाचा तुरा रोवला गेला. शेवगाव पोलिस स्टेशनचे पोलीस काॅंन्स्टेबल प्रशांत आंधळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता तर कुस्त्यांचे सुत्रसंचालन पैलवान छगन पानसरे सर यांनी केले होते.हा गावातील यात्रा महोत्सव साजरा करण्यासाठी गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य,पोलिस पाटील,चेरमन, व्हा चेरमन, ग्रामस्थ आणि यात्रा पंच कमेटीच्या वतीने योग्य नियोजन करण्यात आले होते.मढीला जाण्या अगोदर कानिफनाथांनी या माळरानावर काही काळ वास्तव्य केले होते.अशी अख्यायिका आहे.म्हणून सर्व प्रथम दशमीच्या दिवशी ही यात्रा भरते.आणि मग इतर गावातील यात्रेस प्रारंभ होतो.वडुले खुर्द,मीरी,मोहोज फाटा, तिसगाव,निवडुंगे,मढी या ठिकाणी कानिफनाथ वास्तव्यास होते म्हणून या ठिकाणाला विषेश महत्व प्राप्त झाले आहे. या यात्रेस पंचक्रोशीतील अनेक भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Don`t copy text!