मीरीच्या पाणीप्रश्ना बाबद माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतली जलजिवन मिशनच्या अधिकाऱ्यांची झाडाझडती
! साडेचार कोटींच्या निधीचा हिशोब द्या! मिरीच्या रास्ता रोको आंदोलनात प्राजक्त तनपुरे अधिकाऱ्या वर बरसताच घोटाळे बाजांचे धाबे दणाणले ?
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
उन्हाळा सुरू होण्याच्या अगोदरच अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील मीरीचा पाणीप्रश्न चांगलाच पेटला असून माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी मिरी पाणीप्रश्नावर भव्य रास्ता रोको आंदोलन केले. जेव्हा अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले त्या नंतरच आंदोलन स्थगित करण्यात आले. पाथर्डी तालुक्या तील मिरी येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामात निकृष्ट कामामुळे झालेली दिरंगाई आणि आर्थिक गैरकारभारा मुळे पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत झालेल्या अनियमितते मुळे मीरी ग्रामस्थ चांगलेच आक्रमक होऊन संतापले होते.पिण्याच्या पाण्याच्या अनियमित पाणी पुरवठ्या विरोधात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात सर्व पक्षीय गावकऱ्यांचा प्रचंड जनसागर रस्त्यावर उतरला होता. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी केले होते. यावेळी त्यांनी जलजिवन मिशनच्या अधिकाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी काढत संबंधित अधिकाऱ्या समोर पाणी पुरवठ्या संदर्भात वेगवेगळे प्रश्न उपस्थित करून अनेक प्रश्नांचा भडीमार करत अधिकारी आणि ठेकेदारांना फैलावर घेत चांगले खडेबोल सुनावले होते. मी मंजूर केलेल्या पाणी पुरवठा योजनेचा साडेचार कोटींचा निधी नेमका कोठे गेला तीन वर्षे उलटली तरी अजूनही काम अपूर्णच असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत.या जलजिवन मिशन योजनेसाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी मंजूर होऊन त्या कामाची वर्क ऑर्डर डिसेंबर २०२२ सालात काढली होती.तेव्हाच कार्यारंभ आदेशही देण्यात आला होता.त्यावेळी एकाच वर्षात या योजनेचे काम पूर्ण करायचे होते असा नियम घालून दिला असताना आजपर्यंत तब्बल तीन वर्षे उलटून गेली तरी ही योजना पूर्ण का झाली नाही.आजपर्यंत ग्रामस्थांना माहिती आहे की या योजनेचे काम अपूर्ण असतानाही सुमारे अडीच कोटी रुपयांची बिले काढली ती कोणत्या निकषांवर अदा करण्यात आली असा सवाल तनपुरे यांनी यावेळी उपस्थित केला.तसेच कोणत्याही प्रकारचे ठोस असे अधिकृत कारण नसताना ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ का देण्यात आली? तीन वर्षांनंतरही जलजिवन मिशनच्या माध्यमातून झालेली पाणी योजना पूर्ण होत नसेल तर याला जबाबदार कोण? मीरीच्या ग्रामस्थांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न म्हणजे चेष्टा वाटली काय? टँकर द्वारे व मिरी-तिसगाव योजनेतून होणारा पाणीपुरवठा हा तात्पुरता उपाय आहे.परंतु एवढा मोठा निधी मंजूर झाला असताना ही कायमस्वरूपी उपाययोजना का होत नाहीत? संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना कोणी पाठीशी घालत आहेत का?अशा कठोर शब्दांत तनपुरेंनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.तनपुरेंच्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांची बोलती बंद होउन त्यांना निरुत्तर व्हावे लागले हे आंदोलन स्थळी सर्व सामान्य लोकांना दिसून आले.यावेळी ठेकेदार कोणत्याही पक्षाचा असो, त्याला काळ्या यादीत टाका. व मिरी गावच्या पाणी प्रश्नाबाबत लेखी उत्तर दिल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, असा पवित्रा प्राजक्त तनपुरे यांनी घेतला होता.त्यामुळे अधिकारी आणि ठेकेदारांना पळता भुई थोडी झाली होती.लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले होते.ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता प्रशांत जायभाय यांनी लेखी आश्वासन देत २० दिवसांत मीरी गावातील गावठाण हद्दीतील टाकीचे काम पूर्ण करून गावांसाठीचा पाणीपुरवठा सुरू करण्याचे मान्य केले. उर्वरित तीन टाक्या ३० दिवसांत पूर्ण करण्याची अंतिम मुदत ठेकेदाराला देण्यात आली असून आठ दिवसांत काम सुरू न झाल्यास व पुन्हा मुदतीतच कामपूर्ण न केल्यास ठेकेदारावर फौजदारी स्वरूपाची कारवाई केली जाईल,असे नमूद करण्यात आले आहे.लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र मुदतीनंतरही दिरंगाई झाल्यास पुन्हा रास्ता रोको करून संबंधित अधिकारी व ठेकेदारांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्याशिवाय मागे हटणार नाही, असा सनसनित इशाराच प्राजक्त तनपुरे यांनी यावेळी दिला.
“कृत्रिम पाणीटंचाई निर्माण” माजी सरपंच संतोष शिंदें यांनीही गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत.भाजपचे मंडळाध्यक्ष तथा मीरीचे माजी सरपंच संतोष शिंदे यांनी ठेकेदार व अधिकाऱ्यां मुळे मिरीत कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाल्याचा आरोप केला आहे.प्रमुख ठेकेदाराने स्वतःचा वाटा घेऊन प्रत्यक्ष काम स्थानिक ठेकेदाराकडे दिल्याचे त्यांनी सांगितले.माझ्या
पत्नीची मान्यता नसतानाही तीचे नाव टाकून मीरी ग्रामपंचायतीने खोटा ठराव सादर करण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी आंदोलनात लेखी पुरावेच सादर केले. जलजीवन मिशन च्या कामातील गैरव्यवहाराची चौकशी लावूनही अहवाल जाहीर न केल्याचा आरोप करत या कामाची पारदर्शक चौकशी व्हावी व संबंधित ठेकेदाराकडून नुकसान भरपाईची मागणी त्यांनी केली. तसेच स्थानिक ठेकेदाराच्या विरोधात आवाज उठवण्याचे काम करणाऱ्यांना ही फोनवरून धमक्या देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु मी धमक्यांना घाबरणार नाही तर शेवटपर्यंत पाठपुरावा करणार,धमकी देणाऱ्यांना जशास तसे त्याच भाषेत उत्तरे दिले जाईल असा दणदणीत इशाराही त्यांनी दिला. ठेकेदाराने गावातील जेसीबी मशीन या कामासाठी लावलें होते पण त्यांची बीले देण्यात आली नाही.बिलांचा प्रश्न उपस्थित केला असता ठेकेदाराने आपले हात झटकले असुन त्या बीलाची जबाबदारी घेण्याचे टाळले.
कामातील खोदाईसाठी वापरण्यात आलेल्या जेसीबी चालकांची बिले थकीत असल्याचा मुद्दाही यावेळी आंदोलनात उपस्थित करण्यात आला. पण मुख्य ठेकेदाराने प्रत्यक्ष काम स्थानिक ठेकेदाराकडे दिल्याचे सांगून जबाबदारी झटकण्याचा केविलवाणा प्रयत्न केल्याने जेसीबी मशीन मालकानी तीव्र स्वरूपाच्या संताप व्यक्त केला. आंदोलकांनी शासकीय टँकरची मागणी केली असता नायब तहसीलदार यांनी प्रशासनाच्या वतीने सकारात्मक प्रतिसाद दिला.
जोपर्यंत ही जलजिवन मिशनच्या पाणी पुरवठ्याची योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू ठेवावा,अशा सूचना तनपुरेंनी तहसीलदारांना दिल्या आहेत. मीरी ग्राम पंचायती मार्फत पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो त्वरित वरिष्ठ कार्या लयाकडे पाठवावा या बाबत सकारात्मक निर्णय होण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे नायब तहसीलदार सानप साहेब यांनी आश्वासन दिले.
या रास्ता रोको आंदोलनात मीरी गावातील सर्व ग्रामस्थांनी सर्वपक्षीय एकजूट दाखवल्या मुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या आंदोलनात संतोष शिंदे, भागिनाथ गवळी, डॉ. बबनराव नरसाळे,एकनाथ झाडे,राजू मामा तागड,विजय गवळी,महादेव कुटे,गिरधारी डहाळे,बापू मिरपगार,यांनी पाणी टंचाईवरील आपले विचार व्यक्त केले. यावेळी पोपटराव गवळी,माणिक गवळी,नारायण सोलाट,नामदेव दारकुंडे,बंडू झाडे, नंदराज कुटे,राजू शेख,मच्छिंद्र दारकुंडे,संभाजी दारकुंडे,उद्धव दुसंग,अमोल वाघ,जालींदर वामन यांच्यासह सर्वपक्षीय नेते व ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.राष्ट्रवादी काॅंग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या गटाचे नेते प्राजक्त तनपुरे यांच्या नेतृत्वा खालील या आंदोलनात ग्रामस्थ म्हणून भाजपचे अनेक कार्यकर्ते सहभागी झाल्याने राहुरी- पाथर्डी विधानसभा मतदार संघातील राज कारणाला चांगलीच कलाटणी मिळाल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.भाजपाचे जेष्ठ नेते राजूमामा तागड यांनी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांना टॅंकर भरण्यासाठी आपल्या शेतातील सौर ऊर्जेचा वीजपंप गावांसाठी उपलब्ध करून दिला म्हणून काही नाठाळांनी थेट विखे पाटील यांच्या कडे लावालाव्या केल्या आहेत असे त्यांनी आंदोलन स्थळी सांगितले. एकंदरीत मीरीचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकवटल्या चे दिसुन आले. पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.त्यामुळे आंदोलन स्थळी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

























