Home महाराष्ट्र महाराष्ट्रातील पहिली होळी श्री क्षेत्र मढी येथिल कानिफनाथ गडावर पेटली भट्टीचा सण...

महाराष्ट्रातील पहिली होळी श्री क्षेत्र मढी येथिल कानिफनाथ गडावर पेटली भट्टीचा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा 

महाराष्ट्रातील पहिली होळी श्री क्षेत्र मढी येथिल कानिफनाथ गडावर पेटली भट्टीचा सण पारंपारिक पद्धतीने उत्साहात साजरा

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्रात भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथिल कानिफनाथ गडावर मानाची पहीली होळी पेटली.आणि भट्टीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला.संपूर्ण मढी गावाची मिळून एक होळी असते. ती होळी कानिफनाथ गडावरील मंदिरासमोर कान्होबाची आरती केल्या नंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते विधिवत पूजा करून पेटवण्यात आली.संपुर्ण राज्यातील होळी ही हुताशनी पौर्णिमेच्या दिवशी पेटते परंतु ही होळी मात्र १५ दिवस आधीच पेटवली जाते.हा होळीचा सण साजरा करणारे मढी हे संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव गाव आहे याच सणाला भट्टीचा सण असे ही संबोधले जाते. मढी येथील कान्होबा गडावरील होळीला सुमारे ५०० वर्षांची परंपरा आहे. हा इतिहास आहे. हुताशनी पौर्णिमेला पेटणाऱ्या सार्वजनिक होळीचा मान हा गोपाळ समाजाला आहे. परंतु मढी गावचे ग्रामस्थ मात्र या पौर्णिमेच्या दिवशी होळीचा सण साजरा करीत नाहीत.

बुधवार दिनांक (१८)फेब्रुवारी २०२६ रोजी रोजी रात्री नऊ वाजता कानिफनाथ महाराजांची आरती केल्या नंतर भट्टीची(होळी) विधीवत पुजा करून मढी येथिल कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत रात्री नऊ वाजता ही होळी पेटवण्यात आली.या प्रसंगी उप जिल्हाधिकारी गणेश मरकड, पाथर्डीचे प्रांधिकारी प्रसादजी मते साहेब,पाथर्डीचे तहसीलदार उद्धव नाईक साहेब, पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब, कानिफनाथ देवस्थान ट्रस्टचे नवनिर्वाचित अध्यक्ष विठ्ठलराव मरकड, कोषाध्यक्ष दादासाहेब मरकड,सचिव सौ.माधुरी मरकड,विश्वस्त उत्तमराव मरकड,अनिल साठे,सौ.उषाताई मरकड,भाजपा युवा मोर्चाचे नेते कुशलजी भापसे,माजी सरपंच भगवान मरकड, बाळासाहेब मरकड,बबन महाराज भिसे,प्रदीप पाखरे,शंकर पाखरे, विष्णू महाराज मरकड, राधाकिसन मरकड,भागेश मरकड,किरण मरकड,चंद्रभान पाखरे, बाळासाहेब मरकड,शामराव मरकड, डॉ.रमाकांत मडकर,मढीचे ग्रामविकास अधिकारी गणेश ढाकणे,संतोष मरकड,किरण मरकड,देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी आधिकारी अशोक पवार साहेब, व्यवस्थापक संजय मरकड आणि देवस्थानचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

संपूर्ण मढी गावातील गाईच्या शेणाच्या गोवऱ्या वाजत गाजत कानिफनाथ गडावर आणण्यात आल्या,सडा समार्जन करून सुर्यास्तापुर्वी भट्टी रचून ती रात्री ९ वाजता पेटवण्यात आली. दहा फुट उंच आणि पन्नास बाय पन्नास फूट रुंदीची भट्टी रचण्यात आली होती.संपुर्ण मढी गावात घरोघरी पाहुण्यांची वर्दळ होती.तर गडावर अनेक भाविकांची गर्दी होती. गावातील प्रत्येक घरातून नाथांना व होळीसाठी पुरणपोळीचा महानैवेद्य वाजत गाजत मिरवत नेहुन अर्पण करण्यात आला होता.होळी पेटल्यानंतर अनेक भाविकांनी प्रदक्षिणा घालून नारळ अर्पण केले.श्री क्षेत्र मढी येथिल कान्होबा गडावर चैतन्य कानीफनाथांची संजीवन समाधी आहे. होळीपासून सुरू झालेली यात्रा गुडीपाडव्या पर्यंत सुरू असते. या होळीसाठी

फक्त गोवऱ्यांचाच वापर करण्यात आला होता.तेथे लाकडाचा वापर करण्यात आला नाही.संपूर्ण मढी

गावातून सुमारे दोन टन गोवऱ्या येथे आणण्यात आल्या होत्या.१५ फूट व्यासाचे वर्तुळ व सुमारे दहा फूट उंचीची रचलेली होळी म्हणजे नाथ सांप्रदायाची भव्य धूनी म्हणून या कडे सर्व नाथभक्त पाहतात.या होळीचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये फक्त गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गोवऱ्याचाच वापर केला जातो.येथे लाकडाचा कोठेही वापर केला जात नाही. उप जिल्हाधिकारी गणेश मरकड साहेब यांनी संपूर्ण अधिकारी वर्गाला सपत्नीक आमंत्रित करून त्यांचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.आणि प्रीती भोजन दिले.यामध्ये शेवगाव पाथर्डी चे प्रांताधिकारी प्रसादजी मते साहेब, तहसीलदार उद्धव नाईक साहेब,पोलिस निरीक्षक विलास पुजारी साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी आणि सर्व पत्रकार यांचा समावेश होता. अध्यक्ष विठ्ठलराव मरकड यांनी आभार मानले.

Don`t copy text!