सोयगाव बारी समाजाला नवे नेतृत्व; संघटन बळकटीकरणाच्या दिशेने ठोस पाऊल
सोयगाव | प्रतिनिधी : दत्तात्रय काटोल
अखिल भारतीय बारी संघाच्या वतीने सोयगाव तालुक्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली असून, या निवडीमुळे सोयगाव बारी समाजाच्या संघटनात्मक बांधणीला नवे बळ मिळाले आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नेतृत्वाची ही निवड समाजाला योग्य दिशा देणारी ठरणार आहे.
अखिल भारतीय बारी समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष रमेशजी घोलप व छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष रतनजी फुसे यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
यामध्ये सोयगाव तालुका बारी समाज अध्यक्षपदी श्री. हरिदास रामदास काटोले,
सचिवपदी श्री. गणेश पांडुरंग आगे,
उपाध्यक्षपदी श्री. राजू तुकाराम फुसे,
तर उपसचिवपदी श्री. दत्तात्रय गोविंदा काटोले यांची निवड करण्यात आली आहे.
या नव्या नेतृत्वामुळे समाजातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागतील, युवकांना संघटित करण्यास चालना मिळेल तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी प्रभावी प्रयत्न होतील, असा विश्वास समाजबांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बारी समाजाच्या एकतेला बळकटी देत समाजहिताची कामे गतिमान करण्याची मोठी जबाबदारी या पदाधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली आहे.
या निवडीबद्दल सोयगाव तालुक्यातील बारी समाज बांधव, ज्येष्ठ नागरिक, युवक व मित्रमंडळी यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. समाजाच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.























