स्व. दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालयाचे ‘प्रवास कलेचा’ चित्र प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

स्व. दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालयाचे ‘प्रवास कलेचा’ चित्र प्रदर्शनाचे थाटात उद्घाटन

 

पाचोरा येथील स्व. दादासाहेब अनिल देशमुख चित्रकला महाविद्यालयात ‘प्रवास कलेचा’ या शीर्षकाखाली आयोजित करण्यात आलेल्या चित्रप्रदर्शनाचे नुकतेच उत्साहात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद जळगाव जिल्हा कलाध्यापक संघाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. अरुण नारायण सपकाळे यांनी भूषविले. ज्येष्ठ शिल्पकार व चित्रकार श्री. आप्पासो निरंजन भास्कर शेलार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून अलंकारिक शैलीचे भीष्मपितामह मानले जाणारे ज्येष्ठ चित्रकार श्री. श्याम कुमावत, निवृत्त ज्येष्ठ कलाशिक्षक श्री. एल. झेड. कोल्हे, त्रिमूर्ती आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. सुशीलकुमार चौधरी, महात्मा फुले हायस्कूलचे कलाशिक्षक श्री. चैतन्य नवगीरे, पी.एन.जी. आर्ट गॅलरीचे व्यवस्थापक श्री. गिरीश ढेरे, श्री. शेलकर सर, श्री. अशोक सोनार, श्री.माळी सर आणि श्री. प्रदीप सोनार ,गिरीश पाटील,आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. संदीप पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून प्रदर्शनामागची भूमिका विषद केली. या प्रदर्शनात महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा कलाशिक्षक प्रमोद पाटील, सागर मोरे, राहुल सोनवणे, निलेश महाजन जामनेर आर्ट अकॅडमी चे संचालक निलेश कुवर यांच्यासह ए.टी.डी. प्रथम व द्वितीय वर्षाचे विद्यार्थी मनोज मालचे, भूमी पाटील, प्राची, नेहा पाटील, साक्षी पाटील, ज्योती पाटील,प्रथमेश सोनवणे, हर्षदा जोशी, योगिता पाटील, दिशा ठाकूर, गुणवंती पाटील, निलेश कुंवर, अथर्व सुतार, विशाल तडवी, पुजा देसाई,राधा मोरे, प्रणाली पाटील,आमिर तडवी ,भूमी पाटील,सानिका पाटील,अश्विन कुमार, तीर्थराज जोशी, भूमी पाटील, रोशनी पाटील आणि शिवानी शर्मा यांच्या विविध कलाकृती मांडण्यात आल्या आहेत.

यावेळी मार्गदर्शन करताना श्री. कोल्हे सर व श्री. आप्पासो शेलार यांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे कौतुक केले. अध्यक्षीय भाषणात श्री. सपकाळे यांनी विद्यार्थ्यांना कलेच्या क्षेत्रातील संधी आणि भविष्यातील वाटचालीबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कुमारी दिशा ठाकूर हिने केले, तर विद्यार्थी मनोगत भूमी पाटील व गुणवंती पाटील यांनी व्यक्त केले. शेवटी योगिता पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले. हे प्रदर्शन पाहण्यासाठी शहरातील कलाप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.