अवैध रीत्या वाळु तस्करी करणाऱ्या माफियाच्या विरोधात गुन्हे शाखेची धडक कारवाई,वाळू तस्करी करणाऱ्या आरोपीकडून 5,10,000 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त
(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
याबाबतची माहिती अशी की अहिल्या नगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील अवैध वाळु वाहतुकी संदर्भात वाळू माफिया विरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
सदर आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक संदिप मुरकुटे, पोलीस अंमलदार रमीराजा आत्तार, भगवान थोरात, विशाल तनपुरे, गाडी चालक महादेव भांड यांचे एक पोलीस पथक तयार करुन अवैध वाळु वाहतुक करणाऱ्या इसमांविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी रवाना केले होते. वरील पथकाने राहुरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध वाळु उत्खनन व उपसा करणाऱ्या इसमा बाबत माहिती काढत असताना वरील पोलीस पथकास गुप्त बातमीदारा मार्फत पक्की खबर मिळाली होती की शेरी चिखलठाण गावच्या शिवारात वन विभागाच्या जागेतुन एक इसम ट्रॅक्टरमधुन वाळुची चोरटी वाहतुक करीत आहे. त्यानंतर मग पोलिस पथकाने शेरी चिखलठाण ते संगमनेर कडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा लावुन दबा धरून थांबले असता सदर पोलिस पथकास एक तांबड्या रंगाचा ट्रॅक्टर वाळू घेऊन येतांना दिसताच पोलिस पथकाने सदर वाळूने भरलेले वाहन थांबवुन त्यावरील चालकास पोलीसांची ओळख सांगुन त्यास ताब्यात घेतले .व त्याचे नांव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नांव 1) सुनिल रेवजी भुतांबरे (वय 21 वर्षे),राहणार सुतारवाडी, शेरी चिखलठाण तालूका राहुरी असे असल्याचे सांगितले. मग पोलिस पथकाने त्याच्याकडे वाळु वाहतुकीच्या शासकीय परवान्या बाबत विचारपुस केली असता त्याने त्याच्याकडे वाळु वाहतुकीच्या दृष्टीने कोणताही शासकीय परवाना नसल्याचे सांगितले ताब्यात घेतलेल्या इसमास ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मालका बाबत माहिती विचारली असता त्याने ट्रॅक्टर ट्रॉलीचे मालक हे जमीर पिरन सय्यद राहणार ,शेरी चिखलठाण तालुका,राहुरी (फरार) जिल्हा अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. मग पोलीसांनी
ताब्यातील इसमाच्या कब्जातुन 5,00,000 रुपये किमतीची एक ट्रॅक्टर ट्रॉली, आणि 10,000 रुपये किंमतीची 1 ब्रास वाळु असा एकुण 5,10,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून जप्त करण्यात आला असुन आरोपी विरोधात पोलीस कॉन्स्टेबल बक्कल क्रमांक 2446 भगवान बाळासाहेब थोरात नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांच्या फिर्यादीवरुन राहुरी पोलीस स्टेशन मध्ये गु.र.नं. 68/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 3(5) सह पर्यावरण कायदा कलम 3/15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी करीत आहे.सदरची कारवाई ही अहिल्यानगर जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या सुचना व मार्गदर्शना खाली स्थानिक गुन्हे शाखेच्या वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील राहुरी,नेवासा, शेवगाव,पाथर्डी तालुक्यातील वाळू तस्करांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत त्या मुळे पोलिस खाते आणि महसूल यंत्रणेने वाळू माफिया विरोधात धडक कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.

























