प्रजासत्ताक दिनी बालम टाकळीच्या भगवान बाबा मल्टी स्टेट बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठेवीदाराचे बालम टाकळी ते बोधेगाव या रस्त्यावर अर्ध नग्न आंदोलन?   

प्रजासत्ताक दिनी बालम टाकळीच्या भगवान बाबा मल्टी स्टेट बँकेच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्यासाठी ठेवीदाराचे बालम टाकळी ते बोधेगाव या रस्त्यावर अर्ध नग्न आंदोलन?

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

बालम टाकळीच्या भगवान बाबा मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटीच्या संचालक मंडळाने मुदत संपलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परत दिल्या नाहीत म्हणून प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर ठेवीदारा तर्फे बालमटाकळी ते बोधेगाव पोलिस चौकी या रस्त्यावर अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले.या अर्ध नग्न आंदोलनात प्रथम सामाजिक कार्यकर्ते मधुकर पाटेकर,यांनी आपल्या अंगावरील कपडे काढून पोलिस प्रशासनाचा निषेध व्यक्त करीत असा आरोप केला की संशयित आरोपीचे आणि पोलिस प्रशासनाचे लागे बांधे आहेत म्हणून हा गुन्हा दाखल केला जात नाही.असे सांगून या आंदोलनात ते सहभागी झाले होते.भगवान बाबा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या खात्यात ठेवलेल्या ठेवी मुदत संपलेल्या खातेदारांना अनेक चकरा मारून ही परत माघारी मिळत नाहीत म्हणून अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी ते बोधेगाव या रस्त्यावर अनेक ठेवीदारातर्फे अर्ध नग्न आंदोलन करण्यात आले. भगवान बाबा मल्टी स्टेट को ऑपरेटीव्ह क्रेडिट सोसायटी मध्ये सभासदांनी ठेवलेल्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवीच्या मुदती संपलेल्या रकमेची मागणी केली तरी त्या सोसायटीत आर्थिक गैरकारभार असल्यामुळे पैशाचा अपव्यय झाल्याने सभासदांना सोसायटीत ठेवलेल्या ठेवी पुन्हा परत मिळत नाहीत.म्हणून या बॅंकेच्या संचालक मंडळावर कठोर कारवाई करावी अन्यथा या पेक्षा ही तीव्र आंदोलन केले जाईल असे आंदोलकांनी सांगितले.या गैर व्यवहार प्रकरणी या बॅंकेच्या चेरमन,व्हा चेरमन, संचालक, मंडळावर आर्थिक फसवणूक केली म्हणून शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करावेत अशी मागणी केली जात आहे.परंतू शेवगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जात नाही.या भगवान बाबा मल्टी स्टेट बँकेच्या संचालक मंडळावर श्रीरामपूर पोलिस स्टेशनमध्ये दिनांक २६ डीसेंबर २०२५ रोजी गुन्हा रजिस्टर नंबर १०४७/२०२५ भारतीय दंड संहितेचे कलमं ४२०,४०६,३४,३,४ या कलमान्वये राहुरी येथील ठेवीदार “निकिता सचिन पवार” मोबाईल नंबर ९३०९४००३६५ राहणार,केसापूर, तालुका,राहुरी, जिल्हा अहिल्यानगर, हल्ली मुक्काम श्रीरामपूर,यांच्यासह एकूण ४८ ठेवीदारांनी या बॅंकेच्या एका मॅनेजर सह सात संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे.त्या सर्व ठेवीदारांनी एकुण २९३९०२६४ रुपयांची गुंतवणूक केली होती.परंतू ते पुन्हा माघारी परत मिळाले नाहीत म्हणून हा गुन्हा दाखल झाला आहे.तेव्हा पासुन या बॅंकेच्या चेरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य,व त्यांचा व्हा चेरमन मुलगा मयुर रंगनाथ वैद्य,आणि(सीओ)/ संचालिका असलेली सून जयशाली मयुर वैद्य (सुरवसे), संचालक, नितीन सोपान तुपे, संचालक शांतीलींग नागनाथ साखरे , संचालक किशोर अनिल सुरवसे, संचालक,राम लखन पोपळघट ,प्रविण म्हैसे यांच्या सह त्यांचं सगळं संचालक मंडळ फरार झाले आहे.आता बोधेगाव शाखेतील मुदत संपलेल्या ठेवीदारांच्या ठेवी परत मिळत नाही म्हणून सर्व संचालक मंडळावर कारवाई करावी म्हणून ठेवीदार हे ३ फेब्रुवारी २०२३ ते २६ नोव्हेंबर २०२५ पासून शेवगाव येथील पोलिस स्टेशन, उपविभागीय अधिकारी कार्यालय,जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालय येथे चकरा मारत आहेत पण ठेवीदारांना ऊडवा उडवीची उत्तरे देऊन बोळवण केली जात आहे असे ठेवीदारांचे म्हणणे आहे. कोट्यवधी रुपयांच्या ठेवीच्या रक्कमा मुदत संपलेली असताना ही ठेवीदारांना परत मिळत नाही मग जिल्हा फेडरेशन काय झोपा काढत आहे काय? भगवान बाबा मल्टी स्टेट बँकेच्या सर्व शाखांचे व्यवहार बंद आहेत.संस्थेच्या सर्व मालमत्ता विकून ठेवीदारांच्या ठेवी द्याव्यात अशी मागणी केली जात आहे.पण संचालक मंडळ सर्वच पैसे देण्याच्या भुमिकेत दिसतं नाही.संस्थेच्या चुकीच्या गलथान कारभारामुळे आणि गेल्या सात आठ महीन्या पासून पोलिस खात्याच्या चालढकल वृत्तीमुळे शेवगाव येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जात नाही.पोलिस अधिकारी सांगतात की तुमचा गुन्हा श्रीरामपूर येथे वर्ग करू आणि नंतर काहीही केले जात नाही हे ठेवीदारांचे म्हणणे आहे.अहिल्यानगर येथील आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस उप अधीक्षक गणेश उगले साहेब यांनी दिनांक १०/९/२०२५ रोजी शेवगाव चे पोलिस निरीक्षक यांना लेखी आदेश दिले होते की एक ठेवीदार महेश संभाजी लांडे यांचा तक्रार अर्ज जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाला असल्याचे सांगून तात्काळ कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले होते तरीही शेवगाव पोलिसांनी सदर आदेशाला केराची टोपली दाखवून त्या आदेशाची अंमल बजावणी केली नाही तर पायमल्ली केली. आणि वरीष्ठांना कोणत्याही प्रकारचा अहवाल सादर केला नाही. शेवगाव तालुक्यातील फसवणूक झालेल्या अनेक ठेवीदारांना ११ ते १८ टक्के व्याजाचे आमिष दाखवून पैशाच्या ठेवी स्वीकारल्या होत्या मात्र मुदत संपलेली असताना मुळ रक्कम व्याजासह परत देण्यात आली नाही.या संदर्भात पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे साहेब यांच्या ही कार्यालयात ही तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यांनी कारवाई चे नुसते आश्वासन दिले पण प्रत्यक्षात मात्र काहीच झाले नाही असं ठेवीदार म्हणतात.पोलीस महासंचालक यांच्या दालनात जाऊन तालुका पोलिस स्टेशन, उपविभागीय पोलिस अधिकारी,जिल्हा पोलिस उपअधीक्षक, अधिक्षक,यांनी काहीच कारवाई केली नाही म्हणून तक्रार दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्यक्षात गुन्हा जेथे घडला तेथील संबंधित पोलिस स्टेशनमध्ये एम पी आय डी कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे.पण तसे होताना दिसत नाही.पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होउ नये म्हणून या फरारी संशयित आरोपीचा राजकीय धुरंधर कोणता “आका” आहे हे आता ठेवीदारांच्या लक्षात आले आहे.त्या आकाला ही शेवगाव तालुक्यात आता फीरू देणार नाही असे ठेवीदारांचे म्हणणे आहे. शेवगाव तालुक्यातील अनेक गावांत अनेक ठेवीदारांचे या सोसायटी मधिल ठेवीमुळे आर्थिक दिवाळे निघाले आहेत पण ठेवीदारांना न्याय मिळेनासा झाला आहे.संपूर्ण शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघात शेअर बाजाराने धुमाकूळ घालून जनतेला लुटले आहे आणि आता या भगवान बाबा मल्टी स्टेट बँकेच्या चेरमन आणि संचालक मंडळाने लोकांच्या पैशावर डल्ला मारला आहे.यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडले आहेत.पोलीसां कडून गुन्हे दाखल करण्यात दिरंगाई होत आहे.कुंपणानेच शेत खाल्ले तर मग सामान्य जनतेने न्याय कुणाकडे मागायचा हा यक्षप्रश्न ठेवीदारां पुढं उभा राहिलेला आहे. महेश संभाजी लांडे या ठेवीदारांनी तर ही ठेवीची रक्कम मिळाली नाही तर मला आणि माझ्या पत्नीला आत्महत्या केल्या शिवाय दुसरा पर्याय दिसत नाही असा एका निवेदनाद्वारे लेखी इशाराच दिला आहे.सरकारी अधिकारी या कारवाई साठी अजुन काही बळी जाण्याची वाट पहात आहेत की काय असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. बालम टाकळी ते बोधेगाव पोलिस चौकी या रस्त्यावरील अर्ध नग्न आंदोलनात दिपक मदनप्रसाद चौबे,महेश संभाजी लांडे, विठ्ठल हुगे, भाऊसाहेब बबनराव गव्हाणे, आणि मधुकर पाटेकर यांच्या सह अनेक ठेवीदार सहभागी झाले होते.शेवगाव तालुक्यातील २५ ठेवीदारांच्या एकुण ३ कोटी २९ लाख ८८ हजार ५०९ रुपयांच्या ठेवीच्या रक्कमा गुंतलेल्या आहेत. अजूनही अज्ञात ठेवीदार किती आहेत हे पोलिसांनी प्रामाणिकपणे तपास केला तर तपासात निष्पन्न होईल.नाहीतर तेरी भी चूप आणि मेरी भी चूप या म्हणीप्रमाणे सारा कारभार बिन बोभाटपणे सुरू राहील .