सोयगाव येथील शेतकरी कुटुंबातील युवकाची इंडियन नेव्हीत निवड
सोयगाव | प्रतिनिधी : दत्तात्रय काटोले
सोयगाव येथील शेतकरी रामभाऊ आगे यांचा मुलगा सनी रामभाऊ आगे याची इंडियन नेव्हीमध्ये निवड झाल्याने संपूर्ण सोयगाव तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. अत्यंत साध्या परिस्थितीतून, कठोर परिश्रम व जिद्दीच्या जोरावर सनीने हे यश संपादन केले आहे.
शेतकरी कुटुंबातील हा युवक देशसेवेसाठी सज्ज झाल्याने गावकऱ्यांकडून त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सनी आगे याने आपल्या यशातून ग्रामीण भागातील तरुणांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
आजच्या काळात अनेक तरुण मोबाईलच्या आहारी जात असताना, अभ्यास, शिस्त आणि मेहनतीच्या जोरावर इंडियन नेव्हीमध्ये निवड होऊ शकते, हे सनीने सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये “तरुणांनी मोबाईलपासून दूर राहून अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे व आर्मी, पोलीस, नेव्ही यांसारख्या सेवांमध्ये भरती व्हावे” अशी सकारात्मक चर्चा होत आहे.
सनी आगे यांच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह मित्रपरिवार, नातेवाईक आणि विविध स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सनीच्या या यशामुळे सोयगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
फोटो दत्तात्रय काटोले

























