पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न

पाथर्डी पोलिस स्टेशन तर्फे पत्रकार सन्मान सोहळा संपन्न!

 

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पत्रकार सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त पत्रकार दिनाचे औचित्य साधून आणि मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी पोलिस स्टेशनमध्ये पत्रकार सन्मान सोहळा संपन्न झाला.पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब, उपनिरीक्षक, संदिपजी ढाकणे,दुसरे उपनिरीक्षक विलास जाधव यांनी उपस्थित पत्रकारांना सन्मानित केले. आता पर्यंत अनेक पोलिस निरीक्षक येथुन बदलून गेले.परंतू तिसगाव येथील गोवंश हत्येबाबत कोणीही कारवाई केली नाही.आम्ही कारवाई केली म्हणून कोणाचे हीत संबंध दुखावले गेले असतील तर आमचा नाईलाज आहे.सरकारने गोवंश हत्या बंदीचा कायदा केला त्याची अंमल बजावणी करणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे.ते आम्ही प्रमाणिक पणे पार पडून सरकारी नियमांचे पालन केले आहे.कोणी काहीही आरोप करून आम्हाला बदनाम करत असेल तर आमचा नाईलाज आहे. पाथर्डी शहरातील आंबेडकर चौक,नाईक चौक,माणिकदौडी चौक येथे थांबून शाळकरी मुलींची छेड छाड करणाऱ्या सडक सख्याहरींना जागेवरच चोप देऊन सुतासारखे सरळ केले जाईल असे त्यांनी औपचारिक रीत्या बोलताना सांगितले. उपस्थीत पत्रकारांनी शहरातील आणि तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी काही सुचना केल्या आहेत त्या ही तातडीने अंमलात आणल्या जातील असे पुजारी साहेब यांनी सांगितले. या वेळी जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री,जनार्दन बोडखे सर,शन्नो पठाण,सचिन दिनकर,अक्षय वायकर,अजय गांधी,अनिल खाटेर,हरीहर गर्जे, स्पेशल क्राईम रिपोर्टर सुनिल नजन यांच्या सह ग्रामीण भागातील काही पत्रकार उपस्थित होते.पत्रकारांच्या वतीने,जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री आणि हरीहर गर्जे यांनी आपले विचार व्यक्त केले. कोणत्याही पत्रकारला आम्ही नाराज करणार नाही राहीलेल्या ग्रामीण भागातील वार्ताहरांना ही सन्मानित केले जाईल असे पोलिस निरीक्षक पुजारी साहेब यांनी सांगितले.