Home महाराष्ट्र तिसगाव मधिल जाधव हाॅटस्पीटलच्या शुभारंभा प्रसंगी आमदार राजळे यांनी ३९ गावाचे पालकत्व...

तिसगाव मधिल जाधव हाॅटस्पीटलच्या शुभारंभा प्रसंगी आमदार राजळे यांनी ३९ गावाचे पालकत्व स्वीकारले,जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सांभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू 

तिसगाव मधिल जाधव हाॅटस्पीटलच्या शुभारंभा प्रसंगी आमदार राजळे यांनी ३९ गावाचे पालकत्व स्वीकारले,जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सांभाव्य उमेदवारांची चाचपणी सुरू

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) राहुरी-पाथर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार स्व.शिवाजीराव कर्डिले यांच्या अकाली निधनामुळे रीक्त झालेल्या मतदार संघाचे पालकत्व शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदार संघाच्या भाजपच्या हॅट्ट्रिक आमदार मोनिकाताई राजळे यांनी स्विकारल्याची घोषणा नविन वर्षाच्या प्रारंभीच त्यांनी स्वतः तिसगाव येथे केली.त्या जवखेडे खालसा येथील माध्यमिक शिक्षक पोपटराव जाधव सर यांचे चिरंजीव डॉ.ऋषिकेश आणि अनिरुद्ध आणि सुनबाई सौ.डॉ.मेघा आणि सौ.नम्रता यांच्या जाधव हाॅटस्पीटलच्या शुभारंभा प्रसंगी बोलत होत्या. जाधव हॉस्पिटलचे उद्घाटन आमदार मोनिकाताई राजळे यांच्या हस्ते झाले.पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती काशिनाथ पाटील लवांडे यांच्या सुचने नुसार त्यांनी ही घोषणा केली. यावेळी व्यासपीठावर वृद्धेश्वर साखर कारखान्याचे माजी चेरमन उद्धवराव वाघ, उपसरपंच पंकज मगर,बाळासाहेब लवांडे,शिंदे गुरुजी,इलियास शेख,काॅंम्रेड रामभाऊ दातीर,सु.परदेशी हे आवर्जून उपस्थित होते.प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते या नवीन दवाखान्याच्या प्रवेश द्वाराजवळ फीत कापून उद्घाटन करण्यात आले.पोपटराव जाधव सर,आणि त्यांच्या जवखेडे येथे अंगणवाडी सेविका असलेल्या सौभाग्यवती अंजनाताई जाधव यांनी सर्वांचे स्वागत केले.जेष्ठ नेते उद्धवराव वाघ यांनी थोडक्यात जाधव कुटुंबियांचा इतिहास उपस्थितांना उलगडून सांगितला.घरात अठरा विश्व दारिद्रय असलेल्या जाधव सरांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन आपला प्रपंच उभा करून आपल्या मुलांना ही वैद्यकीय शिक्षण देऊन डॉक्टर केले ही समाजाच्या दृष्टीने अतिशय अभिमानाची बाब आहे.डाॅक्टर ऋषिकेश जाधव यांनी एम बी बी एस मध्ये एम डी ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी आमच्या जवखेडे खालसा या गावात जाऊन दवाखाना सुरू करून ग्रामस्थांची चांगली सेवा केली आहे असे वाघ पाटील यांनी सांगितले.आता सन २०२६ या नविन वर्षाच्या प्रारंभीच तिसगाव येथे अद्ययावत सुविधा उपलब्ध असलेला दवाखाना सुरू केला आहे.तिसगाव मधिल या नवीन दवाखान्यात ईसीजी,एक्सरे, ऑक्सिजन, सुविधा,मल्टीपॅरा माॅनिटरींग, नेब्युलायझेशन,फिजिओ थेरपी, रक्त लघवी तपासणी, दुर्बीणीद्वारे कानाची तपासणी,इत्यादी सुविधा या दवाखान्यात उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.तसेच डायबीटीस,उच्च रक्तदाब, थायरॉईड, कावीळ,बालरोग, स्त्रीरोग,वंध्यत्व निवारण, अस्थीरोग, संधिवात,त्वचा रोग,गुप्तरोग, हृदय विकार, श्वसन विकार,पोटाचे विकार,किडनी विकार,कान,नाक,घसा,विकार, मेंदूविकार, पॅरालाईसीस,फिट मानस विकार, अनिद्रा,कोरोना, दमा,नागिण, टायफाईड,डेंग्यू, मलेरिया, मुळव्याध, मुतखडा इत्यादी विविध विकारांवर येथे उपचार केले जाणार आहे.तसेच या विविध आजारांवर रामबाण औषधे मिळण्यासाठी तेथेच न्यु गुरूकृपा मेडिकल ही सुरू करण्यात आले आहे.तिसगाव पंचक्रोशीतील रुग्णांनी या दवाखान्यात दाखल होऊन आपल्या आजारांवर उपचार करून घ्यावेत असे आवाहन जाधव परीवाराच्या वतीने करण्यात आले आहे.या शुभारंभा प्रसंगी दिलिप गांधी,शंकरराव उंडाळे,रविंद्र आरोळे,रफिक शेख,हरीभाऊ जाधव,अमोल जाधव,देविदास कुलट,तुकाराम कुलट,दत्तू मराठे, पोपटराव रावळे, गणेशराव दगडघाटे,संभाजी वाघ,गणेश कंगे,डहाळे सराफ, बाबासाहेब वांढेकर,निवृत्त ग्रामसेवक कराळे साहेब, शिवाजीराव मतकर,शिवाजी मुळे,विक्रम नेहुल सर, काकडे सर,भगत सर,कचरे सर, संजय कांबळे,शाकिर शेख,युनुस शेख सर,दुर्गाशंकर मल्टीस्टेट चे सचिव मारुती दगडखैर साहेब, यांच्या सह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैभव आंधळे यांनी केले.तिसगाव मधिल बाजार असल्याने सत्यनारायण महापूजेचे दर्शन आणि प्रसादासाठी पंचक्रोशीतील लोकांनी मोठी गर्दी केली होती.राहुरी विधानसभा मतदार संघात पाथर्डी तालुक्यातील पश्चिम भागातील ३९ गावाचा समावेश होतो.स्व.कर्डिले साहेब यांच्या निधनामुळे तेथे सर्व सामान्य लोकांना आपल्या कामासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे.त्यामुळे आमदार मोनिकाताई राजळे यांनी या गावांचे पालकत्व स्वीकारून ३९ गावातील लोकांना दिलासा दिला आहे.आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, आणि विधानसभा निवडणुकीत आमदार मोनिकाताई राजळे या पश्चिम भागातील ३९ गावांत अनेक महत्त्वाचे निर्णय घेणार आहेत.मीरी जिल्हा परिषद गट हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तेथे भाजपची ताकद निर्माण करण्यासाठी आमदार राजळे विखे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली उमेदवारांची चाचपणी करीत आहेत.काशिनाथ पाटील लवांडे यांनी तर तिसगाव गटात मोनिकाताई राजळे यांच्या शब्दांच्या पलीकडले आम्ही नाहीत.आमच वय झाले आहे त्यांचा शब्द आम्ही प्रमाण मानून त्या देतील त्या उमेदवाराचे आम्ही प्रमाणिक पणे काम करू अशी ग्वाही दिली.त्यामुळे तिसगाव गटात भाजपला अनुकूल वातावरण आहे. आता उमेदवारी कोणाला मिळेल या कडे सर्व इच्छुक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

Don`t copy text!