अहिल्यानगर जिल्ह्यात नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाला भोपळा

(सुनिल नजन चिफब्युरो स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
अहिल्यानगर जिल्ह्यात नगर परिषदेच्या झालेल्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला शुन्य भोपळा मिळाला आहे. संपूर्ण जिल्ह्यात झालेल्या निवडणुकीत भाजपने ७ जागावर विजय मिळवला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेने २ जागेवर विजय मिळवला आहे.महाविकास आघाडीने १ जागेवर विजय मिळवला आहे, राष्ट्रीय काॅंग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे,संगमनेर सेवा समितीने १ जागेवर विजय मिळवला आहे. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अहिल्यानगर जिल्ह्यात पार धुव्वा उडाला असून पुर्णपणे सुपडा साफ झाला आहे. विजयी झालेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुढील प्रमाणे आहेत.
१)जामखेड /प्रांजल चिंतामणी/ भाजप.
२) श्रीरामपूर/ करण ससाने/ काँग्रेस.
३) नेवासा /डॉ. करण सिंह घुले/ शिवसेना शिंदेगट.
४) राहता /स्वाधीन गाडेकर/ भाजप.
५) संगमनेर/ डॉ. मैथिली तांबे/ संगमनेर सेवा समिती.
६) शिर्डी /जयश्री थोरात/ भाजप.
७) श्रीगोंदा/ सुनिता खेतमाळीस/ भाजप.
८) पाथर्डी/ अभयराव आव्हाड/ भाजप.
९) राहुरी/ भाऊसाहेब मोरे/ महाविकास आघाडी.
१०) शेवगाव/ माया अरुण मुंडे/ शिवसेना शिंदेगट.
११) कोपरगाव /पराग संधान/ भाजप.
१२) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा/ सत्यजित कदम /भाजप.या प्रमाणे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विजयी झाले आहेत.उबाठा शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला नगराध्यक्ष पदाची एकही जागा जिंकता आली नाही.जिल्ह्यात नगरसेवक मात्र अनेक पक्षांचे निवडून आले आहेत.

























