शिंदे गट वगळता दानवे, पवार व काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचसूत्री कार्यक्रम संपन्न

शिंदे गट वगळता दानवे, पवार व काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचसूत्री कार्यक्रम संपन्न

 

 

 

सोयगाव | प्रतिनिधी – दत्तात्रय काटोले

 

सोयगाव तालुक्यात महाविकास आघाडी व भाजपाच्या काही पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते व माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रंगनाथ नाना काळे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचसूत्री सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

हा कार्यक्रम शिवसेना (उ. बा. ठा.) शहरप्रमुख रविंद्र काटोले व राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहर अध्यक्ष रविंद्र काळे यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला. याअंतर्गत माजी मंत्री कै. बाबुराव काळे मराठी शाळा, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा व जिल्हा परिषद प्रशाला येथील हजारो विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

याशिवाय ग्रामीण रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)च्या वतीने रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. माजी नगरसेवक एकनाथ महाजन सर यांच्या वतीने विद्यार्थ्यांना स्वेटरचे वितरण करण्यात आले. शिवसेना तालुका प्रमुख दिलीप मचे यांच्या वतीने अंबादास दानवे, शरद पवार व रंगनाथ काळे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव मंदिरात महाआरती करण्यात आली.

 

या कार्यक्रमाला रविंद्र काळे, दिलीप मचे, रविंद्र काटोले, राजू काळे, सूर्यभान गवळी, दीपक बागुल, एकनाथ महाजन, मयूर मनगटे, मंगेश सोहणी, कृष्णा जुनघरे, दीपक देशमुख, चंद्रकांत काळे, श्रीराम पाटील, सुभाष चौधरी, संत ज्ञानेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रावसाहेब बारोटे, डॉ. सुनील चौधरी, निलेश गावडे, पंकज गावीत, शंकर कानडे, दीपक लिंबे, विनोद चव्हाण, सुशील जावळे, कमलेश काळे, अंकुश पगारे, दत्तात्रय काटोले, दत्तात्रय ढगे, विष्णू मापारी, ज्ञानेश्वर एलिस, अजय नेरपगारे आदी उपस्थित होते.

 

केंद्रीय प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक किरण पाटील, सुरेखा चौधरी, पंकज रगडे, रामचंद्र महाकाळ, मंगला बोरसे, सविता पाटील, प्रतिभा कोळी, अंकुश काळे, शुभम देसले, अनिल देसाई तसेच जिल्हा परिषद प्रशालेचे मुख्याध्यापक दादाराव राठोड, परदेशी, उबरकर, ढगे यांनीही सहभाग नोंदविला.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंगला बोरसे यांनी केले तर आभार पंकज रगडे यांनी मानले.