नारायण गव्हाण शिवारात अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळला, मयताच्या नातेवाईकांनी सुपा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा : पोलिस निरीक्षक,ज्योती गडकरी

नारायण गव्हाण शिवारात अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळला, मयताच्या नातेवाईकांनी सुपा पोलिस स्टेशनशी संपर्क साधावा : पोलिस निरीक्षक,ज्योती गडकरी

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) गुरूवार दिनांक १३ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास अहिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील सुपा पोलिस स्टेशनच्या हद्दीत नारायण गव्हाण शिवारात पुणे-नगर महामार्गा पासून सुमारे शंभर मीटर अंतरावर एका पंचवीस ते तीस वर्षे वयाच्या अज्ञात पुरूषाचा मृतदेह आढळून आला आहे. सदर मयताचे शारीरिक वर्णन पुढील प्रमाणे आहे.उंची पाच फूट पाच इंच, रंग गोरापान,केस कुरळे,अंगावर फुल बाह्यांचा गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळ्या रंगाची अरमानी पॅन्ट,डाव्या बाजूच्या कानाखाली “आई”ही अक्षरे गोंदलेली आहेत,तर उजव्या हातावर “क्षत्रिय कुलावतंस” गणपतीचे टॅटू , आणि उजव्या मनगटात लाल भगव्या रंगाचे दोरे बांधलेले आहेत.डाव्या पायाचा अंगठा व पंज्याजवळ जुन्या जखमेची निशाणी,असे वर्णन असलेल्या पुरुष व्यक्तीचा मृतदेह वरील ठिकाणी आढळून आला आहे.सदर मयत व्यक्ती बाबद कोणालाही काही माहिती असल्यास किंवा कोणत्याही पोलिस स्टेशनच्या डायरीत मिसींगची नोंद असल्यास त्यांनी सुपा पोलिस स्टेशनच्या कर्तव्यदक्ष पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी मॅडम यांच्याशी 9763890223 या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन पोलिस निरीक्षक गडकरी मॅडम यांनी केले आहे. सदर मयत व्यक्तीच्या अंगावरील खाणा खुणा वरून ती व्यक्ती ही छत्रपती शिवाजी महाराज यांना मानणारी होती.”क्षत्रिय कुलावतंस” ही आद्याक्षरे शक्यतो मराठा समाजाच्या व्यक्तींच्या शरीरावर,अंगावर किंवा मोटार गाड्यांवर आढळून येतात. त्यामुळे ती व्यक्ती ही मराठा समाजातील असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.तरी माहीत गार व्यक्तीने त्वरित पोलिस खात्याला सहकार्य करावे अशी पोलिस खात्याकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.