राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध येथे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध येथे घनकचरा व्यवस्थापन कार्यशाळा संपन्न

 

पारध दि. १४ ऑक्टोबर 🙁 श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी)भिलदरी बहुउद्देशीय संस्थेच्या राजर्षी शाहू महाविद्यालय, पारध येथे राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व सेव वसुंधरा सेवाभावी संस्था, बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने “घनकचरा व्यवस्थापन” या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून शितल जयंत सोनवणे, सेव वसुंधरा सेवाभावी संस्था, बुलढाणा या उपस्थित होत्या.

 

प्रमुख पाहुण्या शितल सोनूने यांनी घनकचरा व्यवस्थापनाचे महत्व स्पष्ट करताना सांगितले की, “घरगुती तसेच शैक्षणिक संस्थांमधील ओला आणि सुका कचरा वेगळा करून त्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावल्यास पर्यावरणाचे रक्षण होऊ शकते.” त्यांनी विद्यार्थ्यांना ‘कचऱ्यातून संसाधन निर्माण करण्याची’ संकल्पना पटवून दिली व स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

 

या कार्यशाळेस महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. अमोल बांडगे, महर्षी पारशिर ऋषी इंग्लिश प्रायमरी स्कूलच्या प्राचार्या निलाशा लोखंडे, तसेच पद्मा परदेशी, भाविका धनवाणी, मोक्षदा धनवाणी आदी मान्यवर उपस्थित होते. विद्यालयाचे मुख्याध्यापक व्ही. एस. लोखंडे, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. अनिल मगर, तसेच प्रा. रवींद्र पानपाटील यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामेश्वर पाडळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या निलाशा लोखंडे यांनी मान्यवरांचे आभार मानून केले.

 

कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजाराम डोईफोडे यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनासाठी सजग राहण्याचे आणि घनकचरा व्यवस्थापन हा प्रत्येकाचा सामाजिक दायित्वाचा विषय असल्याचे सांगितले.

 

या कार्यशाळेत राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, विद्यार्थी व शिक्षकवर्ग यांचा उत्स्फूर्त सहभाग होता.