भारताचे सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय जाहीर निषेध!!! — बोरसे गुरुजी

भारताचे सरन्यायाधीश यांच्यावरील हल्ला अतिशय निंदनीय जाहीर निषेध!!! — बोरसे गुरुजी

 

 

 

तालुका भोकरदन जिल्हा जालना

भारताचे सरन्यायाधीश आदरणीय भूषण गवळी साहेब यांच्यावर काल जो भर न्यायालयामध्ये हल्ला करण्यात आला त्याचा निषेध करावा तेवढा थोडा आहे. हा एका व्यक्तीवरील हल्ला नसून भारताच्या सर्वोच्च स्थानी असणाऱ्या सरन्यायाधीशांच्या खुर्चीवरचा हल्ला आहे. तो फक्त सरन्यायाधीशांचा अवमान नाही तर संपूर्ण देशाचा आणि 140 कोटी जनतेचा हवामान आहे ज्या विकृत बुद्धिमत्तेने हा हल्ला झालेला आहे ती अतिशय निंदनीय आहे. त्यानिमित्ताने सर्वांना सावधान करून असे सांगावेसे वाटते की,पुढार्‍यांनो सावधान!बंद करा जातियवादी राजकारण!अन्यथा देश रसातळाला जाईल!आता ठासुन सांगा सर्व जगाला आम्ही फक्त भारतिय आहोत!संविधान आमचा पवित्र ग्रंथ आहे!तिरंगा आमची शान आहे!हिंदुस्थान आमचा महान आहे!

सध्याची जातीजातीमध्ये आणि धर्मा धर्मामध्ये तेढ निर्माण करणारी जी मानसिकता आहे त्याचेच हे परिणाम आहेत. याला राज्यकर्ते जबाबदार आहेत. सध्याच्या काळामध्ये कोणताच नेता जाती शिवाय धर्माशिवाय बोलत नाही. एक हल्ला करतो तर दुसरा प्रती हल्ला करतो आणि त्यातून समाजामध्ये जाती जाती आणि धर्मा धर्मामध्ये दरी निर्माण करण्याचे काम आणि कारस्थान हे सर्व लोक करत आहेत.ते जरी स्वतःच्या राजकारणाची पोळी शेकण्यासाठी या सर्व गोष्टी करत असले तरी देशाला ही बाब परवडणारी नाही. यामुळे देशामध्ये अराजक माजेल जातीजातीमध्ये धर्माधर्मांमध्ये वाद निर्माण होतील. देशाच्या दुश्मनांच्या मनामध्ये जे स्वप्न आहे तेच आपण पुर्ण करत आहोत का ? आरजक माजावे देश रसातळाला जावा अशा प्रकारचे शत्रुत्वाच्या भावना असणाऱ्या लोकांना यातून आनंदच मिळेल. त्यामुळे मित्रांनो सावध राहा जपून बोला जपून वागा आपण सच्चे भारतीय असाल तर संविधानाचा पुरेपूर आदर करून आपल्या तिरंग्याचा मान ठेवून आपला देश महान आहे हे सर्व जगाला दाखवून द्या! पूर्वीपासून चालत आलेली निंदनीय परंपरा जाती जातीला कमी जास्त लेखन बंद करा. अन्यथा काळ आपल्याला माफ करणार नाही आणि पुढच्या पिढ्यांचे भवितव्य आपण अंधारात टाकत आहोत याची सुद्धा आपण जाणीव ठेवत नाहीत.ही बाब गंभीर असून आपल्यासाठी आपल्या देशासाठी कधीच चांगली नाही. त्यामुळे सर्व जगामध्ये आपली निंदा होत आहे. याचे सुद्धा राज्यकर्त्यांना भान असले पाहिजे.शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते की अरे सुधरा रे !!!.