चोपडा महाविद्यालयात भारोत्तोलन,शक्तीतोलन (पुरुष व महिला) आणि शरीरसौष्ठव (पुरुष) स्पर्धेचे आयोजन
चोपडा : येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत, एरंडोल विभागीय अंतर महाविद्यालयीन भारोत्तोलन,शक्तीतोलन (पुरुष व महिला) आणि शरीरसौष्ठाव (पुरुष) स्पर्धांचे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य, डॉ. के. एन. सोनवणे होते. तसेच या उदघाटनप्रसंगी उपप्राचार्य प्रा.डॉ. ए. बी. सुर्यवंशी, महाविद्यालयाचे समन्वयक, डॉ. एस. ए. वाघ त्याचप्रमाणे विविध महाविद्यालयातून आलेले क्रीडा संचालक प्रा. दीपक पाटील, मुकुंद शिरसाठ, खुशाल देशमुख इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्र. प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून आणि धरणगाव महाविद्यालयाचे क्रीडा संचालक प्रा. दीपक पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी क्रीडा क्षेत्रात करिअरच्या संधी संधी उपलब्ध आहेत, याविषयी मार्गदर्शन करून खेळाडूंना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर स्पर्धांमध्ये पावर लिफ्टिंग या क्रीडा प्रकारात दादासाहेब डॉ.सुरेश. जी. पाटील महाविद्यालयाच्या पुरुष संघाने प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि एसएसबीटी इंजिनिअरिंग महाविद्यालय बांबोरी या संघाने द्वितीय क्रमांक प्राप्त केला तसेच बी.पी. आर्ट्स महाविद्यालय, चाळीसगाव चा संघाने तृतीय क्रमांक प्राप्त केला. त्याचप्रमाणे वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात पुरुष व महिला या दोन्ही संघांमध्ये दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. यावेळी बॉडी बिल्डिंग (पुरुष) या क्रीडा प्रकारात सर्व खेळाडूंनी उत्कृष्ट प्रदर्शन केले.
या स्पर्धांचे आयोजन वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा संचालक डॉ. क्रांती क्षीरसागर यांनी केले तसेच स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा शिक्षक अमोल पाटील तसेच सुधाकर बाविस्कर आणि आर. एच. पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.