पाचोरा सेवा पंधरवाडा उपक्रमाच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न 

पाचोरा सेवा पंधरवाडा उपक्रमाच्या अनुषंगाने नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर संपन्न

 

पाचोरा सेवा पंधरवाडा उपक्रमाच्या अनुषंगाने, राष्ट्रनेता आणि भारताचे प्रेरणास्त्रोत माननीय नरेंद्र मोदी जी यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंतीनिमित्त, भारतीय जनता पार्टी व महिला मोर्चा पाचोरा शहर मंडळाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिर चे आयोजन करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे अध्यक्ष पाचोरा-भडगाव विधानसभेचे निवडणूक प्रमुख अमोल भाऊ शिंदे होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी मार्गदर्शन मिळवले.

 

या शिबिरात गरुड झेप चे संस्थापक डॉ. सुरेश सोनवणे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांविषयी मौल्यवान टिप्स, तयारीचे मार्गदर्शन, वेळेचे व्यवस्थापन आणि अभ्यासाच्या योग्य पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि करिअरच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत फायदेशीर ठरला.

याप्रसंगी  पुनमताई पाटील  कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ज्योतीताई वाघ ,दीपक भाऊ माने शहराध्यक्ष भाजपा ,  रमेश भाऊ वाणी जिल्हाध्यक्ष व्यापारी आघाडी  मा. सभापती बंसीलाल पाटील, प्रदीप नाना पाटील ,रहीम बागवान अल्पंख्याक सोमनाथ  भाऊ पाटील मोर्चा, विनोद भाऊ नेरकर तालुकाध्यक्ष भडगाव, कांतीलालजी जैन, नूतन ताई पाटील, जगदीश  पाटील, सरलाताई पाटील , ज्योती  भामरे, सतीश देशमुख, उमेश माळी , गिरीश बर्वे  भगवान मिस्तरी लकी पाटील भागवत महापुरे, योगेश ठाकूर, रोहन मिश्रा,  सुनील  नवगिरे,राहुल महाजन, सोहन मोरे, स्वप्निल ठाकरे, गिरीश पाटील, ललित पाटील महेश माळी, नीतीन पाटील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते..