हसनाबादच्या आदित्य सोरमारेची नवोदय विद्यालय आंबा परतूर येथे निवड
हसनाबाद : (श्री महेंद्र बेराड भोकरदन तालुका प्रतिनिधी)
हसनाबाद येथील आदित्य गणेश सोरमारे या विद्यार्थ्याची प्रतिष्ठित नवोदय विद्यालय, आंबा परतूर येथे निवड झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल हसनाबाद येथील सर्व मित्रपरिवार, शिक्षकवृंद व आप्तेष्टांनी हार्दिक अभिनंदन केले. या प्रसंगी आदित्य व त्याच्या परिवाराचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याच कार्यक्रमात २०२४ मधील MTS परीक्षेत जिल्हास्तरावर यश मिळवणारे गुणवंत विद्यार्थी – यश पांडुरंग निबाळकर, नचिकेत किशोर वैष्णव व दिव्या सतीश वाल्डे – यांचाही गौरव करण्यात आला. त्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी, प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मार्गदर्शक राऊत सरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मार्गदर्शन करताना सांगितले की “परिश्रम, चिकाटी व जिद्द या शिवाय यश नाही. प्रत्येक विद्यार्थ्याने मन लावून अभ्यास केल्यास उद्दिष्ट निश्चित साध्य होते.” तसेच आदित्यच्या यशामागे श्री गजेंद्रजी जगदीशलाल जैस्वाल सर यांचे सखोल मार्गदर्शन, विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता, अभ्यासाची जिद्द आणि पालकांचे सहकार्य यांचा त्रिवेणी संगम असल्याचे त्यांनी मत व्यक्त केले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांमध्ये श्री. लक्ष्मण राऊत सर, निबाळकर सर, आयाज पठाण सर, राजगुरू सर, सावंत सर, म्हातारबा सोरमारे, शमीम भैय्या शेख, राहुल भाऊ, गणेश व्यवहारे, मिराज जाधव, उपसरपंच मा. सतीश भाऊ वाल्डे, गजानन इंगळे सर, रावसाहेब रजाळे, कृष्णा सोनोने, दत्ता खडेकर, किशोर वैष्णव सर आदींसह अनेक आजी-माजी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.