जळगांव शहर महानगरपालिका व जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन तर्फे संपन्न
जळगांव शहर महानगरपालिका व जळगांव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जळगांव जिल्हा खो खो असोसिएशन आयोजित म.न.पा. स्तरीय आंतरशालेय खो खो स्पर्धेला दि.21 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या .17 वर्ष आतील मुलांचे 16 तर 19 वर्ष आतील मुलांचे 3 संघ सहभागी झाले होते. ह्या स्पर्धा जळगाव जिल्हा क्रीडा संघाचे मैदानावर पार पडत आहे. मैदान पूजन व श्रीफळ वाळवून राष्ट्रीय खो खो पंच श्री. दिलीप चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी महाराष्ट्र खो खो असोसिएशनचे सहसचिव श्री. जयांशू पोळ सर,जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव श्री. राहुल पोळ सर, राज्य क्रीडा मार्गदर्शक श्री. मीनल थोरात सर , सौ.विद्या कलंत्री मॅडम, सौ.अश्वनि सोहनी मॅडम सौ.ढाके मॅडम डॉ.प्रा.रणजित जाधव सर ,श्री विशाल पाटील सर , श्री जितेंद्र पाटील सर व विविध शाळेचे क्रीडा शिक्षक उपस्थित होते. नैतिक ठाकूर व तृष्णात बोरकर यांनी उत्कृष्ट खेळी केल्या बद्दल डॉ. प्रा.रणजित जाधव सर यांच्या तर्फे प्रत्येकी 101 रुपये रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पंच म्हणून जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे सचिव श्री. राहुल पोळ सर यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तात्रय महाजन विशाल पाटील, दिलीप चौधरी, निखिल पाटील , हर्षल बेडिस्कर,स्वप्नील कोळी ,गोपाळ पवार, निरंजन ढाके, रोहित सपकाळे, छगन मुखडे,प्रथमेश कंकरे, मोहित गुंजकर, अंजली सावंत, प्रतिक्षा सपकाळे यांनी काम पाहिले व स्पर्धा यशस्वी रित्या पार पाडण्यासाठी जळगांव जिल्हा खो खो असोसिएशनचे व श्री. गणपतराव पोळ क्रीडा विकास प्रबोधिनी च्या खेळाडूंनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.
17 मुले
प्रथम – अनुभूती इंग्लिश स्कूल
द्वितीय – आर.आर.विद्यालय
तृतीय – प्रगती माध्यमिक विद्यालय
19 मुले
प्रथम – स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय
द्वितीय – नूतन मराठा काॅलेज
तृतीय – महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय
टीप :- दिनांक 23 सप्टेंबर 2025 वार मंगळवार रोजी 17 वर्ष आतील मुलांचे उर्वरित जिल्हास्तरीय खो खो स्पर्धा आहेत तरी जे सहभागी संघ असतील त्यांनी सकाळी ठीक 9 : 00 वाजेला स्पर्धे ठिकानी रिपोर्टिंग करायचा आहे.