चोपडा महाविद्यालयात पालक सभा उत्साहात संपन्न
चोपडा :येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ .सुरेश जी पाटील महाविद्यालयात वाणिज्य विभागातर्फे पालक सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाप्रसंगी विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रा. डॉ.के. एन. सोनवणे उपस्थित होते.यावेळी उपप्राचार्य डॉ. आर .एम. बागुल, समन्वयक डॉ. शैलेश वाघ व विभाग प्रमुख डॉ. सी .आर. देवरे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात पितृतुल्य कै.
दादासाहेब व मातृतुल्य स्वर्गीय अक्कासाहेब यांच्या प्रतिमापूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित पालकांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विभाग प्रमुख डॉ सी.आर.देवरे यांनी विभागाच्या मार्फत घेतले जाणारे उपक्रम यांची माहिती व कार्यक्रमाची रुपरेषा बद्दल माहिती दिली तसेच महाविद्यालयातर्फे
घेण्यात येणाऱ्या विविध सराव परीक्षांची माहिती देत पालक व शिक्षक यांचा समन्वय किती महत्वाचा आहे याची सविस्तर माहिती दिली. यानंतर पालक सभेप्रसंगी कैलास साळुंखे,सुनील जैन या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले . त्यानंतर मागील वर्षी प्रथम,द्वितीय,तृतीय, क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .यावेळी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ आर. एम.बागुल सर, समन्वयक डॉ. शैलेश वाघ सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच करिअर कट्टाचे समन्वयक सहा.प्रा. श्री.वाय.एन. पाटील यांनी करिअर कट्टाचे महत्त्व सर्व पालकांना समजून सांगितले व पालकांना आवाहन केले की, आपल्या पाल्यास करिअर कट्ट्यांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करा.
यावेळी अध्यक्षीय मनोगतात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ.के एन सोनवणे सर यांनी आजची सद्यस्थिती विद्यार्थ्यांची प्रगती व त्याबद्दल असणारी पालकांची जागरुकता याचे महत्व स्पष्ट केले. तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे विविध उपक्रम ,स्पर्धा परीक्षा वर्ग, ताणतणाव कमी होण्यासाठी घेतली जाणारी कार्यशाळा, मुलांच्या प्रगतीची माहिती घेण्यासाठी, प्रश्न सोडवण्यासाठी महाविद्यालयाला वेळोवेळी भेट देण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमा प्रसंगी जवळजवळ 150 पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह.प्रा.चेतन बाविस्कर यांनी केले तर आभार प्रदर्शन सह.प्रा. प्रवीण जैन यांनी केले. कार्यक्रमाप्रसंगी अर्थशास्त्र विभाग प्रमुख व्ही.पी . हौसे,तसेच वाणिज्य विभागातील सौ.एच.सी.देवरे, भाविका गुजराथी,योगीनी पाटील उपस्थित होते तसेच अनेक विद्यार्थी स्वयंसेवक यांनी देखील कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान दिले.