सोयगाव : खा.डॉ काळे यांच्या कडुन अतिवृष्टी झालेल्या भागाची पाहणी ; तहसील कार्यालयात आढावा
सोयगाव तालुक्यातील बोरमाळ तांडा, बोरमाळ,घोसला,जरंडी अदि भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागांना आज शुक्रवारी (दी.१९) जालना छत्रपती संभाजीनगरचे खासदार डॉ कल्याण काळे व छत्रपती संभाजीनगर व जिल्हाप्रमुख ऊबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली.
अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे शेतीपिके ,जनावरांचे तसेच घरांचे,शेतातील विहीरींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बांधित नागरिकांच्या अडचणी ऐकून घेत तातडीने पंचनामे करून मदत मिळावी यासाठी त्यांनी बांधावर जाऊन अधिकाऱ्यांना सुचना केल्या. तसेच मतदारसंघातील नुकसान झालेल्या बांधवाच्या समस्या लोकसभेत मांडणार असल्याचे म्हणाले.
नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून थेट तहसील कार्यालय गाठले.तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतली. यावेळी बोरमाळ तांडा येथील शेतकरी गौरे यांच्या शेतामध्ये महावितरण विभागाचे तार खाली पडुन असल्यामुळे गौरे यांचे जनावरे दगावली होती.पिडीत शेतकऱ्यांस तात्काळ मदत करण्यात यावी, तसेच घोसला नादगाव येथील साडव्या मुळे व ढगफुटी सद्दश पावसामुळे विहीरी बुजून व वाहुन गेलेल्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत तात्काळ विहिरी मंजूर करून करण्यात याव्या, घाटनांद्रा रस्ता रुंदीकरण करण्यात यावे,अशा सूचना डॉक्टर कल्याण काळे यांनी तहसीलदार व अन्य अधिकाऱ्यांना केल्या.
चौकट :
सोयगाव तालुक्यात झालेल्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले तसेच जमिनी वाहून गेले असल्याने अतोनात नुकसान झालेले असून पावसाची आणेवारीत मोठ्या प्रमाणात वाढली असल्याने सोयगाव तालुका ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी काँग्रेसचे तालुकाप्रमुख राजेंद्र काळे यांनी केली.
यावेळी खा.डॉ कल्याणराव काळे यांच्या सोबत शिवसेना (उबाठा) जिल्हा प्रमुख राजेंद्र राठोड,काँग्रेस तालुका अध्यक्ष राजेंद्र काळे,शहराध्यक्ष दिनेश हजारी,रवि काटोले,ज्ञानेश्वर ईवरे,रवि काळे,युवराज वामने,एकनाथ गोंड,अर्जुन ढगे, भारत पगारे,रामदास पवार,काशिनाथ बडक व ज्ञानेश्वर गाडेकर आदींची प्रमुख उपस्थीती होती.

















