जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत अन्वित जयदीप राजपूत जिल्ह्यात प्रथम
जळगांव – (विशेष प्रतिनिधी) जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगांव व जिल्हास्तरीय जलतरण शालेय क्रीडा स्पर्धेत इयत्ता सातवीचा विद्यार्थी व खेळाडू अन्वित जयदीप राजपूत याने यश संपादन केले असून त्याची नाशिक येथे होणाऱ्या विभागीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
अन्वित हा सेंट जोसेफ विद्यालयाचा इयत्ता सातवीचा विद्यार्थी व खेळाडू असून त्याने चौदा वर्ष वयोगटाच्या आतील स्पर्धेत हे देदीप्यमान यश संपादीत केलेले आहे. त्याला ५० मीटर फ्री स्टाईल प्रथम, ५० मिटर ब्रैस्टस्टोक – द्वितीय, ५० मीटर बैकस्ट्रोक मध्ये तुतीय क्रमांक मिळाला आहे. त्याला सेंट जोसेफ चे शिक्षक आशिष व देवराज सर आणि कोच वैभव सोनवणे सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. त्याचे सेंट जोसेफ विद्यालयाच्या प्राचार्या यांनी अभिनंदन केले आहे. अन्वित हा जयदीप व अनुष्का राजपूत यांचा मुलगा असून त्याचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे.