श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज “विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप”
पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्था संचलित श्री.सु.भा. पाटील प्राथमिक विद्यामंदिर पाचोरा येथे आज “विद्यार्थी गुणगौरव व शैक्षणिक साहित्य वाटप” समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.आमदार तथा पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाऊसो.दिलीप ओंकार वाघ होते.तर बक्षीस-वितरण व शैक्षणिक साहित्य शालेय साहित्य वाटप शुभ हस्ते संस्थेचे चेअरमन नानासो.संजय वाघ,व्हाईस चेअरमन नानासो. व्ही.टी.जोशी,शालेय समिती चेअरमन बापूसो.जगदीश सोनार या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रथमत: मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.तद्नंतर “आयटीएस” व “एक्सलंट ओलंपियाड” या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन गौरवण्यात आले.तसेच शाळेतील गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय गणवेश,दप्तर व वह्यांचे वाटप देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.या शैक्षणिक साहित्याच्या दातृत्वासाठी जय किरण प्रभाजी पतसंस्था,श्रीमती. उषाताई अहिरे ,श्री.नितीन तायडे यांनी दातृत्व केले होते.संस्थेचे जेष्ठ संचालक बाबासो विनय जकातदार व कार्यक्रमाचे म.अध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्यात.तसेच शालेय समितीचे चेअरमन मा.बापूसाहेब यांचा आज वाढदिवस त्यांचा मा.भाऊंच्या हस्ते सन्मान करण्यात आला.सर्व मान्यवरांनी त्यांचे अभिष्टचिंतन करून शुभेच्छा दिल्यात.प्रसंगी संस्थेचे संचालक सर्वश्री अण्णासो.दगाजीराव वाघ,बाबासो.विनय जकातदार, दादासो.खलीलदादा देशमुख,आबासो.भागवत महालपुरे सर, दादासो.विजय देशपांडे, आप्पासो.सतीश चौधरी, दादासो. योगेश पाटील,दादासो.अर्जुनदास पंजाबी,आबासो.अरुण पाटील सर, दादासो.सिताराम पाटील सर,जिभाऊसो.एस.डी.पाटील सर, ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती.लक्ष्माबाई सोनवणे मॅडम उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.मनोज पवार सर यांनी सूत्रसंचालन श्रीमती. वर्षा पाटील मॅडम यांनी तर आभार प्रदर्शन श्री.दीपक पाटील सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी परिश्रम घेतले.

























