आत्महत्या ग्रस्त कर्जबाजारी शेतकऱ्यांनी “धनवंतांनी अखंड पिळले,धर्मांधांनी तसेच छळले,मगरीने जणू माणिक गिळले,चोर झाले साव”हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कवण म्हणून विष प्राशन करीत आपले जीवन संपविले
(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात शेतकऱ्यांना सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.ते पुर्ण न केल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक कर्जबाजारी झालेले शेतकरी वैफल्यग्रस्त होऊन आत्महत्या करीत आहेत.अशीच एक आत्महत्या केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील कुकाण्या पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आदर्श गाव “वडुले” या गावात घडली.बाबासाहेब सुभाष सरोदे असे विषप्राशन केलेल्या कर्जबाजारी शेतकऱ्याचे नाव आहे.आत्महत्या करण्या अगोदर सदर शेतकऱ्याने एक व्हिडिओ तयार करून त्यामध्ये स्वतःची कर्जबाजारी पणाची करूण आत्मकहाणी सांगून आपली जिवन यात्रा संपवली होती.सदर व्हिडिओ मध्ये त्यांनी “मी अल्पभूधारक मागासवर्गिय शेतकरी आहे असे सांगत या सरकारच्या आणि अर्थ व्यवस्थेच्या जिवावर मी आजपर्यंत जिवंत होतो.आज उद्या कर्जमाफी होऊन मी कर्जमुक्त होईल या भोळ्या भाबड्या आशेवर मी आजपर्यंत जगत होतो.दोन वेळा देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मुख्यमंत्री झाले.परंतू त्यांनी बोलल्या प्रमाणे शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले नाही.म्हणून आज माझी कर्जमुक्तीची आशा संपलेली आहे.लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या कवणातील चार ओळी म्हणून दाखवल्या त्या अशा “धनवंतांनी अखंड पिळले,धर्मांधांनी तसेच छळले,मगरीने जणू माणिक गिळले,चोर झाले साव” या प्रमाणे हे सरकार झाले आहे.या सरकारवर गंभीर स्वरूपाचे आरोप करताना त्यांनी असे म्हटले आहे की सरकार मध्ये जी अर्थव्यवस्था आहे ती आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्या साठी नाही.तर ही अर्थ व्यवस्था इंडस्ट्रीयल लोकांसाठी आहे.बजेट मध्ये या देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांच्या सरकारमध्ये आमच्या साठी कांहीच नाही म्हणून मला आत्महत्या करायची वेळ येत आहे.योग्य वेळी सरकार कडून जर मला मदत झाली असती तर मी निश्चितच पुढील आयुष्य जगलो असतो.परंतू आज माझा आत्मविश्वास संंपलेला आहे.माझी कर्जबाजारी शेतकरी म्हणून अत्यंत पिळवणूक होत आहे.म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपल अस्तित्व सिद्ध करायचं असेल तर जिवंत माणसाला अगोदर मरावं लागतं.म्हणून मी हा निर्णय घेत आहे.या जगात जगायचं असेल तर पैशाशिवाय काहीच होत नाही.म्हणून मी हा आत्महत्येचा निर्णय घेतलेला आहे.माझी शेवटची एकच अपेक्षा आहे की जिवंत पणी तर नाही पण मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबाला आणि माझ्या कर्जबाजारी शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी कळकळीची विनंती करतो जयभीम,जय लहुजी,जय अण्णा भाऊ.”असे सांगितले आहे. आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची अभागी पत्नी श्रीमती अर्चना बाबासाहेब सरोदे यांनी असा आरोप केला की वेगवेगळ्या बॅंका,आर बी एल फायनान्स,चोलामंडल फायनान्स, बचत गट, आणि नेवासा फाट्यावरील ज्योती क्रांती पतसंस्था यांनी माझ्या नवऱ्याला धमकी देऊन दमदाटी केली होती.या साऱ्या नैराश्यातून हतबल होऊन त्यांनी आत्महत्या केली.आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना “सातबारा कोरा करू”असे आश्वासन दिले होते.त्याच आश्वासनावर कर्जबाजारी शेतकरी आजपर्यंत जगत होता.परंतू सरकारने दिलेल्या आश्वासनावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही.आत्महत्या करण्यापूर्वी माझ्या नवऱ्याने एक व्हिडिओ तयार करून त्यामध्ये सरकारला जबाबदार धरले आहे.सरकारने सातबारा कोरा न केल्यामुळे माझ्या नवऱ्याला आत्महत्या करावी लागली आहे.पैसे येण्याच्या सर्व वाटा बंद झाल्याने त्यांनी ही आत्महत्या केली आहे.माझ्या नवऱ्याच्या आत्महत्येस मी या सरकारलाच जबाबदार धरले आहे.सरकारने खोटी आश्वासने देऊन काहीच कार्यवाही केली नाही असा सनसनित आरोपही त्यांनी केला आहे.या शेतकरी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका खडबडून जागा झाला.मग राष्ट्रीयकाॅंग्रेस,शेतकरी संघटना,शिवसेना, लहुजीसेना,एकलव्य संघटना,रिपब्लिकन पार्टी,वंचित बहुजन आघडी यांच्या वतीने कुकाणा येथिल चौकात जबरदस्त येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात वंचित आघाडीचे राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण,संभाजी माळवदे,भैरवनाथ भारस्कर,पॅरेलालभाई शेख,पोपट सरोदे, अनिल जाधव,मच्छिंद्र आर्ले,त्रींबक भगदले, शंकरराव भारस्कर, दिपक सरोदे यांच्या सह पंचक्रोशीतील अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता.नेवाशाचे पोलिस उपनिरीक्षक मनोज अहीरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.दरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उबाठा शिवसेनेचे विद्यमान खासदार भाऊसाहेब वाकचौरे,शिंदे सेनेचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील,भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी वडुले येथे जाऊन मयत सरोदे कुटुंबीयाची भेट घेऊन सांत्वन केले.आत्महत्या ग्रस्त शेतकरी कुटुंबाला जर कोणालाही आर्थिक मदत करावयाची असल्यास मयताची पत्नी श्रीमती अर्चना बाबासाहेब सरोदे यांच्या कुकाणा येथिल बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेतील खाते नंबर ६०३९९०६३०४८ या खाते नंबरवर करावी.या बॅंकेचा आय एफ एस सी कोड नंबर MAHB0000607 असा आहे.या कुटुंबात एकूण बारा व्यक्ती आहेत.या मागासवर्गीय कुटुंबाला सरकारने तातडीने आर्थिक मदत करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.