पाचोरा तालुक्यातील प्रियांकाच्या पतीने चारित्र्यावर संशय घेतं खुशालने केला खुशाल खून आरोपी पतीस पोलिसांच्या ताब्यात

पाचोरा तालुक्यातील प्रियांकाच्या पतीने चारित्र्यावर संशय घेतं खुशालने केला खुशाल खून आरोपी पतीस पोलिसांच्या ताब्यात

 

( पाचोरा प्रतिनिधी ) पाचोरा तालुक्यातील जारगाव येथे नव्याने भाडोत्री राहण्यासाठी आलेल्या एका सुखी कुटुंबात आज पहाटे दुःखाचा डोंगर कोसळला कारण होते पतीचा पत्नीच्या चारित्र्यावर संशय,आणि यातुनच रागाच्या भरात पतीने घर कामासाठी वापरण्यात येणाऱ्या चाकुने पत्नीच्या गळ्यावर व पोटात सपासप वार करत पत्नीला जीवानिशी संपविले,प्रियंका खुशाल भदाणे असे मयत विवाहितेचे नाव असुन पती खुशाल भदाणे याने कृत्य केल्यानंतर गळफास लावुन घेत असतांनाच पाचोरा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले आहे. याघटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये मयत प्रियंका हिच्या मावशीच्या फिर्यादीवरून खुशाल पाटील याचे विरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुलकुमार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उ. नि. संजय निकुंभ हे करीत आहेत.