पाचुंद्यावरून प्रस्थान झालेल्या बाबीरदेव रथयात्रेचे माका शिवारातील हॉटेल “अतिथी” येथे जोरदार स्वागत

पाचुंद्यावरून प्रस्थान झालेल्या बाबीरदेव रथयात्रेचे माका शिवारातील हॉटेल “अतिथी” येथे जोरदार स्वागत

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा) नेवासा तालुक्यातील देवगड संस्थानचे प्रमुख गुरुवर्य ह.भ.प. भास्करगीरी महाराज यांच्या प्रेरणेने आणि स्वर्गवासी ह.भ.प. काशिनाथ महाराज शिंदे यांच्या आशीर्वादाने व पाचुंदा येथील बाबीरदेव संस्थानचे प्रमुख मानकरी बाबासाहेब महाराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीक्षेत्र नेवासा तालुक्यातील पाचुंदा ते इंदापूर तालुक्यातील रुई येथील क्षेत्र बाबीरदेव येथे रथयात्रेद्वारा दिनांक १६ ते २५ जुलै या कालावधीत पायी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.दिनांक १६ जुलै रोजी सकाळी पाचुंदा येथुन या दिंडीचे प्रस्थान करण्यात आले. प्रथम गावातील मंदिरात पंचारती ओवाळून महाआरती करण्यात आली.पुर्वी फक्त पाच वारकऱ्या पासुन सुरु झालेल्या या दिंडी सोहळ्यात कोपरे येथील बाबीरदेव भक्त पोपट महाराज उघडे आणि लहाणू महाराज उघडे यांच्या सह आज हजारो भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.ही एक देवाचीच लिला आहे.मार्ग भ्रमण करीत असताना माका येथील गायके महाराज आणि हॉटेल अतिथीचे मालक निलेश महानवर यांनी या दिंडीतील वारकऱ्यांना नाष्टा आणि चहापाणी देउन जोरदार स्वागत केले.या दींडीतील वारकऱ्यांचे सहकारी ह.भ.प.आदिनाथ महाराज निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की बाबीरदेव हा शंकराचा बारावा अवतार आहे.आपल्या प्रपंचाला सुख समाधान व शांती मिळावी आणि निर्व्यसनी होऊन हा परमार्थाचा आनंद लुटता यावा म्हणून या रथयात्रेद्वारा पायी दिंडी सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येते.पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई येथील क्षेत्र बाबीरदेव मंदिरात गेल्यानंतर तेथे भजन किर्तन फुगड्या खेळत परमार्थाचा आनंद घेत हा सोहळा साजरा करण्यात येतो.शेवटी काल्याच्या किर्तनाने या दींडीतील पालखी सोहळ्याची सांगता होते.या दींडीचे चालक मायनाथ अण्णा शिंदे यांनी सांगितले की वैकुंठवाशी काशिनाथ महाराज शिंदे यांनी घालून दिलेल्या परंपरेने ही दिंडी पायी चालत जाऊन रुई येथील बाबीरदेवाचे दर्शन घेऊन पुन्हा माघारी येते.माका येथे या दींडीच्या नाष्टा चहापाणाच्या वेळी स्वागतासाठी गावचे पोलिस पाटील अशोकराव वाघमोडे, बाळासाहेब कोळसे,उबाठा शिवसेनेचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते गोकुळभाउ लोंढे,जेष्ठ नेते राजू मामा तागड, हॉटेल अतिथीचे मालक निलेश महानवर, ह.भ.प.नारायण महाराज गायके, हे आवर्जून उपस्थित होते.यावेळी बाबासाहेब महाराज शिंदे आणि मायनाथ अण्णा शिंदे यांचा शाल श्रीफळ आणि फेटा बांधून सन्मान करण्यात आला.आणि हा दिंडी सोहळा पुढील प्रवासासाठी मार्गस्थ झाला.अनेक भाविक महीला या दींडी सोहळ्यात सहभागी झालेल्या आहेत.