महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याच्या धमकी विरोधात निवेदन

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांना जीवे मारण्याच्या धमकी विरोधात निवेदन

अमळनेर शाखेतर्फे निषेध करून पोलीस उपअधिक्षक व पोलीस निरीक्षकांना दिले निवेदन

 

अमळनेर : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या डिजीटल मिडियाचे प्रदेश अध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी दैनिक जनप्रवास या वृत्तपत्रातून असे म्हटले होते की, पाकिस्तान मधील क्रिकेट खेळाडू जसे पाकिस्तान प्रेम दाखवतात तसे प्रेम बॉलीवूडमधील खान बंधू अभिनेते आपल्या देशाबद्दल उघडपणे भारत प्रेम का दाखवत नाही? आपण देखील भारताच्या बाजूने खंबीरपणे उभे आहोत असे खान बंधूंनी देखील देशप्रेम दाखवायला हवं होतं, असे वृत्त प्रसिद्ध होताच काही अज्ञात इसमांनी निनावी पत्राद्वारे, “तू आठ दिवसात माफी माग अन्यथा तुला गोळीबार करून उडवून देऊ” अशी धमकी दिली आहे. या धमकीचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला असून, राज्य सरकारने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन सिद्धार्थ भोकरे यांना पोलिस संरक्षण देऊन तात्काळ कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी राज्य पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली आहे. या घटनेचा अमळनेर महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ यांच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या गुन्हेगारांना तातडीने अटक करण्याचे आदेश देवून कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली आहे.

तरी तातडीने आमच्या निवेदनाची आपण दखल घ्यावी व पुढील कार्यवाहीस्तव पाठवावे अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा अमळनेर तालुकाध्यक्ष समाधान मैराळे, जिल्हा सरचिटणीस सुरेश कांबळे, जिल्हा उपाध्यक्ष यदुविर पाटील, उपाध्यक्ष प्रवीण बैसाणे, नूर खान, सुरेंद्र जैन, संघटक आत्माराम अहिरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख गणेश चौहान आदि उपस्थित होते.