भडगाव महाविद्यालयात ऑगस्ट क्रांती दिन व आदिवासी दिवस साजरा
भडगाव, ता. येथील पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेच्या सौ.रजनी ताई नानासाहेब देशमुख कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात 9 ऑगस्ट क्रांती दिन व आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. याप्रसंगी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व क्रांतिवीर बिरसा मुंडा जी यांच्या प्रतिमांचे पूजन कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे मा. प्राचार्य डॉ.एन. एन.गायकवाड सर, प्रमुख वक्ते मा. श्री.रविंद्र पाटील,उपप्राचार्य मा. प्रा. डॉ. दीपक मराठे तसेच कला व वाणिज्य शाखेचे मा. समन्वयक प्रा. डॉ.एस.डी. भैसे इतिहास संशोधन संस्थेचे सदस्य प्रा सुरेश कोळी व सर्व उपस्थित प्राध्यापक यांच्या शुभहस्ते करून माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते रवींद्र पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ब्रिटिशांच्या भारतातील आगमनापासून ते 9 ऑगस्ट 1942 च्या चलेजाव आंदोलनापर्यंतच्या ब्रिटिशांच्या विविध धोरणांचा,स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतिकारकांनी दिलेल्या बलीदानाचा इतिहास मांडला.तसेच कार्यक्रमाचे मा.अध्यक्ष प्राचार्य डॉ. एन.एन.गायक वाड यांनी स्वातंत्र्यासाठी जीवन अर्पण करणाऱ्या सर्व क्रांतिकारकांचे व बिरसा मुंडा जी यांच्या कार्याची महती व्यक्त केली. बिरसा मुंडाजी यांनी ब्रिटिशांना धरती, जल, आकाश या तिन्ही गोष्टींवर देशवासीयांचा स्वराज्य व हक्क आहे असे आपल्या लढ्यातून ठणकावून सांगीतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्या लयातील इतिहास विभाग प्रमुख प्रा. डॉ.चित्रा पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. इंदिरा लोखंडे यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन इतिहास विभागामार्फत करण्यात आले होते या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली.