उन्हाळी खो-खो व हॉकी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
जळगाव, दि. 12 -क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व जिल्हा खो खो व हॉकी क्रीडा प्रशिक्षण केंद्र, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यात खो खो व हॉकी या खेळाचा प्रचार प्रसार करणे, खेळाडूंना तंत्रशुध्द प्रशिक्षण देणे तसेच खेळाच्या विविध अत्याधुनिक क्रीडा सुविधा निर्माण करणे. यादृष्टिने दुसरे उन्हाळी खो खो व हॉकी क्रीडा प्रशिक्षण शिबिर 15 ते 25 मे, 2023 या कालावधीत सकाळी 7.00 ते 9.00 तसेच सायंकाळी 5.00 ते 7.00 या दोन सत्रात श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे आयोजित करण्यात आले आहे.
या दुस-या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरामध्ये खो-खो व हॉकी या खेळाचे राज्य क्रीडा मार्गदर्शक यांची सेवा उपलब्ध करून देण्यात आलेली असून, त्यांच्यामार्फत श्री छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल, जळगाव येथे सकाळ व संध्याकाळ या दोन सत्रात खेळाडुंना विनामुल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा/संस्था, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील शाळा विविध क्रीडा संघटना व क्रीडा मंडळे यांनी जास्तीत जास्त विद्यार्थी/विद्यार्थ्यींनीना या उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरांचा लाभ घेण्याबाबत सूचित करावे. तसेच प्रशिक्षण केंद्रांवर येणा-या विद्यार्थ्याच्या नावाची यादी, संपर्क क्रमांक व पत्त्यासह जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगांव येथे पाठवावी. अधिक माहितीसाठी (राज्य क्रीडा मार्गदर्शक खो-खो) मिनल थोरात 8625946709 व (राज्य क्रीडा मार्गदर्शक हॉकी) अरविंद खांडेकर 9822091943 यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.