जुन्या पेन्शन योजनेसाठी पाचोरा तालुक्यातून कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

जुन्या पेन्शन योजनेसाठी पाचोरा तालुक्यातून कर्मचारी जाणार बेमुदत संपावर

पाचोरा ( प्रतिनिधी)
जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी प्राथमिक शिक्षक माध्यमिक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महसूल विभागाचे तलाठी ग्रामसेवक सर्व शासकीय कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जात आहेत कुठल्याही शासकीय काम न करता संपात सहभागी होण्यासाठी संप यशस्वी करण्यासाठी पाचोरा तालुक्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी बंधू-भगिनी यांनी उद्या सकाळी दहा वाजता राजे छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जमून प्रशासनास निवेदन देण्यासाठी एकजुटीने न चुकता जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांनी हजर राहावे . आता नाही तर कधीच नाही याक्तीप्रमाणे सर्वांनी संपात सहभागी व्हावे असे आवाहन सर्व संघटना तर्फे करण्यात येत आहे. या संपात जवळपास सर्वच कर्मचारी संपात उतरणार आहेत.