पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले

पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस तर्फ़े मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांबद्दल अपशब्द वापरले म्हणून त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले

पाचोरा येथे राष्ट्रवादीतर्फे मंत्री सत्तार यांचा निषेध,प्रतिकात्मक छायाचित्रास
झोडे मारून विटंबना व दहन
पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडीच्या वतीने खासदार सुप्रिया सुळे यांच्या संदर्भात अर्वाच्य शब्द वापरणाऱ्या मंत्री अब्दुल सत्तार यांचा तीव्र निषेध करण्यात येऊन प्रतिकात्मक छायाचित्रास चपला, जोडे मारून विटंबना करत दहन करण्यात आले. यावेळी पन्नास खोके एकदम ओके या घोषणांनी शहर दणाणले.
मंगळवार ता. 8 रोजी सकाळी अकरा वाजता राष्ट्रवादी काँग्रेस ,युवक राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडी पदाधिकारी व कार्यकर्ते बाबुराव मराठे व्यापारी संकुला जवळच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात एकत्रित आले .महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वंदना चौधरी ,नितीन तावडे, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, सतीश चौधरी, माजी नगरसेवक भूषण वाघ, अशोक मोरे, रणजीत पाटील, हारुण देशमुख ,सत्तार पिंजारी ,प्रा प्रदीप वाघ, सुदर्शन सोनवणे, प्रकाश पाटील, ॲड अविनाश सुतार ,ए जे महाजन, संजय करंदे, गौरव वाघ, आर एल पाटील, अजय अहिरे, प्रताप सूर्यवंशी, गोपी पाटील, प्रा माणिक पाटील, अशोक चौधरी ,आर जे पाटील, नरेंद्र ठाकरे, बंडू पाटील, महिला आघाडीच्या रेखा देवरे, अभिलाषा रोकडे,प्रा वैशाली बोरकर,प्रा सुनीता मांडोळे, रेखा पाटील, अनिता देवरे ,आशा जोगी, जयश्री हिरे, सीमा साईराजा, मुनमुन सीमाजान ,शांताबाई सीमाजान, रेणुका सीमाजान, गंगोत्री सीमाजान या पदाधिकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी काँग्रेस व महिला आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री अब्दुल सत्तार यांचा गगनभेदी घोषणाबाजीने निषेध नोंदवत पन्नास खोके एकदम ओके, निमका पत्ता कडवा है अशा घोषणा देत हुतात्मा स्मारक मार्गे पदाधिकारी व कार्यकर्ते शिवाजी महाराज चौकात आले. येथेही त्यांनी निषेधार्थ घोषणाबाजी केली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रतीकात्मक छायाचित्रास चपला, बूट मारत विटंबना केली व प्रतिकात्मक छायाचित्राचे दहन केले. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने मंत्री अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवण्यात आले आहे. विकास पाटील यांनी आभार व्यक्त केले.