Home महाराष्ट्र एसटी कंडक्टर ची बायकोच ड्रायव्हर बनली , ट्रॅक्टरला, सोपान महाराजांच्या दिंडीतील रथ...

एसटी कंडक्टर ची बायकोच ड्रायव्हर बनली , ट्रॅक्टरला, सोपान महाराजांच्या दिंडीतील रथ जोडून थेट निघाली पंढरीच्या वारीला 

एसटी कंडक्टर ची बायकोच ड्रायव्हर बनली , ट्रॅक्टरला, सोपान महाराजांच्या दिंडीतील रथ जोडून थेट निघाली पंढरीच्या वारीला

 

 

 

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

संपूर्ण महाराष्ट्रातील दिंड्याचे पंढरीच्या दिशेने वाटचाल सुरू झाली असून अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील पाथर्डी एसटी आगाराचे कंडक्टर बाळासाहेब शिंदे यांची पत्नी चक्क ट्रॅक्टर ड्रायव्हर बनली असून ती वै.ह.भ.प.सोपान महाराज ढाकणे यांच्या दींडीतील रथ ट्रॅक्टरला जोडून थेट पंढरीच्या वारीला निघाली आहे. सरकारने महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिले आहे. सर्व क्षेत्रात त्याचा फायदा आता महिला घेऊ लागल्या आहेत.पाथर्डी एसटी आगारातील वाहक बाळासाहेब विठ्ठल शिंदे यांनी शेतीसाठी ट्रॅक्टर घेतला आहे. त्यांची पत्नी प्रणाली बाळासाहेब शिंदे या हा शेतीसाठी घेतलेला ट्रॅक्टर चालवायच्या शिकल्या आहेत.वृद्धेश्वर वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ह.भ.प.बाबसाहेब मतकर महाराज यांनी त्यांना सोपान महाराज ढाकणे यांच्या पंढरपूर येथे जाणाऱ्या दींडीत येण्याची विनंती केली असता त्यांनी मी तर दिंडीत येईल पण माझ्या सोबत मी नविन घेतलेल्या ट्रॅक्टरला येण्याची परवानगी देत असाल तर मी माझ्या ट्रॅक्टरला ही पंढरीच्या वारीतील विठूरायाचे दर्शन घडविल असे सांगितले. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाउले या उक्तीप्रमाणे महाराजांनी दिंडीत सहभागी होण्यासाठी परवानगी देताच त्यांनी स्वतःच्या ट्रॅक्टरला रथ जोडून दिंडीतील रथाचे सारथ्य केले आहे. जवखेडे खालसा -वाघोली या गावच्या सिमेवर असलेल्या वै.ह.भ.प.सोपान महाराज ढाकणे यांच्या समाधीची वेद शास्त्र संपन्न भटजी विष्णूपंत भालेराव यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली.रामहरी विठ्ठल मतकर यांनी एकादशी निमित्त खिचडी फराळाची पंगत दिली.आणि दिंडीचे प्रस्थान पंढरीच्या दिशेने चालू झाले.टाळ मृदंग,आणि नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथिल शिवशंभो सनी चौघडा वाद्य पार्टी यांच्या वाद्यांचा दणदणाट व फटाक्यांच्या आतषबाजीत आणि तोफांच्या सलामीत या दिंडीची जवखेडे खालसा गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली होती.गावचे सरपंच चारूदत वाघ पाटील यांनी सोपान महाराज ढाकणे यांचे चिरंजीव राजेंद्र ढाकणे,ह.भ.प. बाबासाहेब महाराज मतकर,या दिंडीचे सर व्यवस्थापक रमेशराव दातीर, आणि विणेकरी ज्ञानदेव महाराज ढाकणे यांचा गावच्या वतीने शाल श्रीफळ देऊन सन्मान केला.खंडोबा मंदिर, रेणुका मंदिर, बिरोबा मंदिर,वृद्धेश्वर मंदिर,भैरवनाथ मंदिर,हनुमान- गणपती मंदिर परिसरात या दिंडीचे जोरदार स्वागत करण्यात आले.पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या या दिंडीला निरोप देण्यासाठी या सोहळ्यात ह.भ.प.निवृत्ती महाराज मतकर, अनंत वाघ पाटील,भास्कर नेहुल, आबाजी आंधळे,दगडू आंधळे,भानुदास शिंदे गुरुजी, भाऊसाहेब वाघ, भागवत घाटूळ, विठ्ठल रामजी मतकर,जगन्नाथ पाचे सर, ज्ञानदेव मतकर, सोपानराव जमधडे, पांडुरंग कळकुटे, रावसाहेब वांढेकर,कांता शेळके,लालमन काळे, रंगनाथ गर्जे साहेब, अमोल जाधव, आसाराम मतकर,संजय मतकर यांच्या सह वाघोली – जवखेडे गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.कासार वाडीचे जेष्ठ नेते बाळासाहेब कासार यांनी दींडीतील वारकऱ्यांना खिचडीची पंगत दिली.माका येथील फिनोलेक्स पाईप कंपनीचे संचालक व्यवहारे साहेब यांनी वारकऱ्यांना पिशव्यांचे वाटप केले.ह.भ.प. मच्छिंद्र महाराज भोसले यांनी या दिंडीला वाटेतच भेट दिली.तिसगाव येथील साई हॉस्पिटलचे चालक डॉक्टर अच्युतराव हनुमंत चितळे यांनी वारकऱ्यांना चहापाणी केले.तर रामदास ससाणे यांच्या वस्ती वर मुक्काम करण्यात आला.अशोक ससाणे यांनी नाष्टा दिला,घाटशिरस येथील लक्ष्मणराव कर्डिले यांनी प्रीती भोजन दिले.सावरगाव फाटा येथे अंकुश शिरसाठ यांनी नाष्टा दिला.गंगादेवी येथे मुक्काम करण्यात आला.नंतर पुढील प्रवासासाठी दिंडी पंढरीच्या दिशेने चालू लागली आहे.हा दिंडी सोहळा दिनांक २३ जुलै रोजी पंढरीला पोहोचेल असे संयोजकांनी सांगितले.

Don`t copy text!