Home महाराष्ट्र पाथर्डी पोलिस स्टेशनचे नविन पोलीस निरीक्षक आनंद कोकरे साहेब यांनी आपल्या पदाचा...

पाथर्डी पोलिस स्टेशनचे नविन पोलीस निरीक्षक आनंद कोकरे साहेब यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला

पाथर्डी पोलिस स्टेशनचे नविन पोलीस निरीक्षक आनंद कोकरे साहेब यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला

 

 

 

पाथर्डी तालुका वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला प्रथम सन्मान!

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)

पाथर्डी पोलिस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांची अहिल्या नगर येथे मानव संसाधन विभागात बदली झाल्याने त्यांच्या जागी नव्याने नेमणुक होऊन बदलून आलेले पोलिस निरीक्षक आनंद कोकरे साहेब यांनी आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे. कोणत्याही व्यक्ती वर किंवा समुदायावर खोटे गुन्हे दाखल होणार नाहीत याची त्यांनी शाश्वती दिली.मागे काय झालं त्याचे मला काही देणे घेणे नाही.परंतू माझ्या कार्यकाळात कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होणार नाही,कोणावरही अंन्याय होणार नाही.याची मी खात्री देतो असं आश्वासन कोकरे साहेब यांनी दिले.पाथर्डी तालुक्यातील पत्रकारांनी नवीन पोलिस स्टेशनमध्ये जाऊन नवे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे साहेब यांचा सन्मान केला.पदाचा पदभार स्विकारताच प्रथम त्यांनी मोहोटादेवी, भटक्यांची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र मढी येथिल कानिफनाथ गडावर जाऊन कान्होबाच्या समाधिचे दर्शन घेतले.कोकरे साहेब हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत.माझ्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मी सदैव प्रयत्न करीन अशी ग्वाही त्यांनी दिली.वंचित बहुजन आघाडीचे पाथर्डी तालुका अध्यक्ष पप्पू बोर्डे, सुनिल जाधव, अमोल जाधव आणि तालुक्यातील बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.पप्पु बोर्डे म्हणाले की वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि राज्य प्रवक्ते प्राध्यापक किसनराव चव्हाण सर यांच्या मार्गदर्शना खाली वंचित बहुजन आघाडीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. हंडाळवाडी येथिल हंडाळ परीवारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते होते.त्यांनी ही धनगर समाजाच्या वतीने कोकरे साहेबांचा सन्मान केला.

Don`t copy text!