मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत कासार पिंपळगावला सांगलीच्या मुख्याधिकारी यांच्या कमेटीची जिल्हा पातळीवरील मुल्यांकना साठी धावती भेट

(सुनिल नजन “चिफब्युरो” स्पेशल क्राईम रिपोर्टर अहिल्यानगर जिल्हा)
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियाना अंतर्गत जिल्हा पातळीवरील मुल्यमापन करून वरीष्ठांना अहवाल देण्यासाठी सांगलीच्या कमेटीने कासार पिंपळगावला धावती भेट दिली.ग्राम पंचायतीने केलेल्या विकास कामांची पाहणी करून तातडीने जिल्हा पातळीवरील मुल्यांकन करण्यासाठी सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांच्या कमेटीने विकास कामांची तपासणी केली.जिल्हा पातळीवर मुल्यांकन करून जिल्ह्यातील प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यासाठी मुल्यमापन करण्यात आले.त्यांच्या कमेटी मध्ये सांगली जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे,सांगलीचे सहायक गट विकास अधिकारी अविनाश पाटील,आटपाडी चे विस्तार अधिकारी प्रकाश शिपूरे,तासगाव पंचायत समितीचे विस्तार अधिकारी पोपटराव सुतार,वाळवा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी प्रदीप मोरे,आटपाडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी संतोष कदम,विटा खानापूर पंचायत समितीचे ए पी ओ भारत पुणेकर,जत पंचायत समितीचे बी.एम.एम. अतिश कांबळे यांचा या कमेटीत समावेश होता.या अगोदर मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज तालुका पातळीवरील अभियाना अंतर्गत कासार पिंपळगाव ने तालुका पातळीवरील प्रथम क्रमांकाचे पंधरा लाख रुपयांचे बक्षीस मिळवलं होतं.आता जिल्हा पातळीवरील बक्षीस मिळावे म्हणून या कमेटीने मुल्यमापन केले आहे.या मुल्यांकनात आदर्श शाळा, अंगणवाडी, वाचनालय, सार्वजनिक पाणीपुरवठा,वृक्ष लागवड, सार्वजनिक रस्ते, प्राथमिक आरोग्य केंद्र,पशू उपचार केंद्र,स्मशान भुमी,महीला बचत गट,घरकुल, परसबाग,पाणी अडवा पाणी जिरवा,नदीवरील बंधारे,पावसाचं पाणी जमिनीत जिरवणे,आणि ग्राम पंचायतीने बसविलेले सीसीटीव्ही कॅमेरे, आणि ग्रामपंचायत दप्तर तपासणी यांच्या मुल्यमापना साठी १०० मार्क देण्यात येणार होते.पण यात काही त्रुटी आढळल्यास मार्क कमी होणार होते.मुल्यमापन करणाऱ्या कमेटीचे प्रमुख अधिकारी विशाल नरवाडे हे सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.ते सन २०२० सालातील बॅचचे आय ए एस अधिकारी आहेत.या पुर्वी ते ४ वर्षे भारतीय पोलिस सेवेत आय पी एस अधिकारी होते.त्यांनी धुळे आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे.त्यांना ग्राम पंचायतीच्या डिजीटल परीवर्तना करीता त्यांच्या या विषेश कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय स्तरावर सलग दोन वर्षे राष्ट्रीय ई गव्हर्नन्स पुरस्कारात सुवर्ण पद मिळाले आहे.मुख्य मंत्र्याच्या १०० दिवसाच्या कार्यक्रम अंमल बजावणीत त्यांना संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.तसेच १५० दिवसाच्या विकास कार्यक्रमात त्यांना राज्यातील दुसरे सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून गौरविण्यात आले आहे.तसेच त्यांना महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगा तर्फे बालस्नेही पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.सन २०२४ सालात निवडणूक आयोगाने संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट मतदार नोंदणी अधिकारी म्हणून त्यांना गौरविण्यात आले आहे.तसेच २०२५ सालात आदिवासी विकास,विषेशत: बाल विवाह आणि बाल मजुरी मधिल महत्व पुर्ण योगदाना बदल त्यांना राष्ट्रीय आदिवासी आयोगाच्या अध्यक्षा कडून सन्मानित करण्यात आले आहे.तसेच ते दहावी बारावी च्या बोर्डाच्या परीक्षेत पारदर्शक अभिनव आयोजना साठी ओळखले जातात ज्या मध्ये परीक्षा वर्गात झुम लींकचे थेट रेकाॅर्डीग वापरले जाते.ही पद्धत आता काॅपीमुक्त परीक्षा साठी राज्याचा आदर्श बनली आहे.अशा या महान असलेल्या सांगलीच्या मुख्य कार्यकारी असलेल्या विशाल नरवाडे साहेब या अधिकाऱ्याची कासार पिंपळगावच्या विविध विकास कामांची पाहणी करून तातडीने मुल्यांकन करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.त्यांची टीम गावात येताच त्यांचे गावातील ग्रामस्था तर्फे जोरदार स्वागत करण्यात आले.रस्त्यावर रांगोळी काढून बॅंडच्या पथकात जोरदार स्वागत करण्यात आले.प्रथम त्यांनी गावातील गणपती,विठ्ठल रूक्मिणी,संत ज्ञानेश्वर,तुकाराम, आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतले.गावच्या वतीने त्यांचा भव्य सन्मान करण्यात आला.गावात केलेल्या विकास कामांची चित्र फीत त्यांना दाखविण्यात आली.आणि गावातील विकास कामे पाहून ते भारावलेले दिसत होते.परंतू केलेली विकासकामे ही दप्तरी निटपणे नोंद केलेली आहेत की नाही याची त्यांनी प्रत्यक्ष दप्तर तपासणी केली असता त्यांनी त्यांना वाटेल ते आपले शेरे मारून मार्क दिले आहेत.माजी सरपंच तथा प्रशासक मोनालीताई राजळे आणि ग्राम विकास अधिकारी प्रमोद म्हस्के यांनी त्यांना दप्तर उपलब्ध करून दिले.असलेल्या त्रुटी बाबद समाधान कारक उत्तरे दिली.आता शंभर पैकी नेमके किती मार्क मिळतात यावर पुढील बक्षीस अवलंबून आहे. यावेळी तालुक्यातील अनेक खात्याचे अधिकारी उपस्थित होते.त्या नंतर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील धनगर वाडी येथे जाऊन विविध विकास कामांचे मुल्यांकन केले.या कार्यक्रमात गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

























